solar eclipse in india 21 june annular partial visibility ring of fire
सूर्यग्रहण: 3 राज्यांत पाहायला मिळणार रिंग ऑफ फायर, उर्वरित देशात दिसणार आंशिक स्वरूप By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 6:47 PM1 / 10वर्ष 2020चे पहिले सूर्यग्रहण 21 जून रोजी म्हणजे रविवारी पाहायला मिळणार आहे. 2 / 10पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, सूर्यग्रहण सकाळी 9.16 वाजता सुरू होणार असून, ते दुपारी 2.02 पर्यंत राहणार आहे. 3 / 10म्हणजेच सूर्यग्रहण अंदाजे 6 तास पाहायला मिळणार आहे. सूर्यग्रहण कंकणाकृती असेल.4 / 10कंकणाकृतीची स्थिती पूर्ण केल्यानंतर ते दुपारी 3.04 वाजेपर्यंत आंशिक स्थितीत राहील. त्यानंतर सूर्यग्रहण दिसणे बंद होईल. 5 / 10या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 डिसेंबरला असेल. हे एक संपूर्ण सूर्यग्रहण असेल. तर 21 जून रोजी दिसणारे सूर्यग्रहण आंशिक असूनही आकाशात रिंग ऑफ फायरच्या स्वरूपात पाहायला मिळेल. 6 / 10देश आणि जगातील शास्त्रज्ञ या सूर्यग्रहणाची प्रतीक्षा करीत आहेत. राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या उत्तरेकडील राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती अवस्थेत दिसेल. 7 / 10तर इतर देशात हे सूर्यग्रहण आंशिक स्वरूपात पाहायला मिळेल. डेहराडून, कुरुक्षेत्र, चमोली, जोशीमठ, सिरसा, सूरतगड या ठिकाणी हे सूर्यग्रहण पूर्णपणे रिंग ऑफ फायरसारखे दिसेल. सूर्यग्रहणाचे पूर्ण आकार 98.6 टक्क्यांपर्यंत पाहायला मिळेल.8 / 10आंशिक ग्रहण झाल्यास चंद्र सूर्याला पूर्णतः झाकोळून ठेवत नाही. दिल्लीत 94 टक्के, गुवाहाटीमध्ये 80 टक्के, पाटण्यात 78 टक्के, कोलकातामध्ये 66 टक्के, मुंबईत 62 टक्के आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 28 टक्के इतके सूर्यग्रहण दिसणार आहे.9 / 10ज्या ठिकाणी संपूर्ण रिंग ऑफ फायर दिसेल, त्या ठिकाणी केवळ 31 ते 45 सेकंदच ते पाहता येणार आहे. त्यानंतर रिंग ऑफ फायरचा आकार बदलणार आहे. 10 / 10ज्या ठिकाणी संपूर्ण रिंग ऑफ फायर दिसेल, त्या ठिकाणी केवळ 31 ते 45 सेकंदच ते पाहता येणार आहे. त्यानंतर रिंग ऑफ फायरचा आकार बदलणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications