some interesting facts about kerala village kodinhi where births are just twins
भारतातील एक अनोखं गाव जिथं प्रत्येक कुटुंबात जन्म होतो जुळ्या मुलांचा; डॉक्टर देखील हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 7:48 PM1 / 8भारतात एका गावाची एक अशी खासियात आहे की ज्यामागचं रहस्य आजवर उलगडू शकलेलं नाही. गावातील डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. अशा एका अनोख्या गावाची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.2 / 8इतर गावासारखंच भारतातील हे गाव देखील सर्वसामान्य गाव आहे. पण या गावातील लहान मुलांच्या जन्माची एक अनोखी कहाणी आहे की ज्यानं संपूर्ण जग हैराण झालं आहे.3 / 8केरळच्या मलापुरम जिल्ह्यातील कोदिन्ही गावात एकूण २ हजार कुटुंब आहेत. या गावाची खासियत म्हणजे गावात बहुतेक करुन जुळ्या मुलांचा जन्म होतो.4 / 8एका रिपोर्टनुसार, या गावात २२० हून अधिक जुळी मुलं आहे. गावातील जुळ्या मुलांच्या जन्माचा दर संपूर्ण देशात जन्म होणाऱ्या जुळ्या मुलांच्या दरापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक आहे. 5 / 8महत्वाची बाब म्हणजे या गावात भारतातील पहिला जुळ्यांची संघटना देखील तयार करण्यात आली आहे.6 / 8गावात सर्वात आधी १९४९ रोजी पहिल्या जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यानंतर गावात जुळ्यांचा जन्म होण्याचं प्रमाण वाढत गेलं.7 / 8एका गावात इतक्या मोठ्या प्रमाणात जुळ्या मुलांचा जन्म कसा होतो यावर अभ्यास करण्यासाठी जर्मनी आणि ब्रिटनहून एक संयुक्त पथक आलं होतं. अभ्यासासाठी त्यांनी गावातील लोकांचे डीएनए देखील तपासले. पण आजवर यामागचं खरं कारण कुणालाच कळू शकलेलं नाही.8 / 8गावातील ८५ टक्के लोकसंख्या मुस्लिम बहुल आहे. पण याचा अर्थ असा नाही की हिंदु कुटुंबामध्ये जुळ्यांचा जन्म होत नाही. इथं जवळपास प्रत्येक कुटुंबात जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. दर १ हजार मुलांमध्ये ४२ जुळ्या मुलांचं प्रमाण इथं नोंदवलं गेल्याचं सांगितलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications