Some 'touching' cartoons of Hindu Rashtra Balasaheb Thackeray
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 5:30 PM1 / 10२३ जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९१वी जयंती. कणखर आवाज आणि त्याच आवाजातील भाषणं आणि ज्वलंत पण मार्मिक व्यंगचित्रे ही त्यांची ओळख. याच व्यंगचित्रांच्या आवडीखातर त्यांनी द फ्री प्रेस जर्नलमधून काम केलं मात्र नंतर स्वत:चं ‘मार्मिक’ हे प्रकाशन सुरु केलं. या दिवसानिमित्ताने पाहुयात त्यांची काही व्यंगचित्रं.2 / 10१) १९५६ - स्वतंत्र हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचं हे सत्यचित्र. मोठे उद्योगपती, त्यांचे उद्योगसमूह, बडे भांडवलदार त्यांची ‘शेठगिरी’ गरगरा फुगत असताना सार्वजनिक उपक्रमांचे मात्र कुपोषण सुरु होते. केंद्रीय मंत्री व योजना आयोगाचे उपाध्यक्ष असलेल्या गुलझारीबद्दल नंदा सार्वजनिक उपक्रमांच्या वाढीसाठी बड्या उद्योगपतींकडे आशेने पाहत होते.3 / 10२) १९६० - काश्मिर प्रशानावर फक्त चर्चा आणि बैठका. भारत-पाक पंतप्रधानांचे हे नेहमीचेच मॅच फिक्सींग. नेहरु-अयुब खानांपासून आजपर्यंत.4 / 10३) १९६० - देशाची जनता, गरिबी, दारिद्र्याच्या वणव्यात होरपळत असताना पं. नेहरु व त्यांचे मंत्रिमंडळ ‘महागाई’ कमी होईल, या आशेने चंद्रकोरीकडे पाहत बसले. 5 / 10४) १९६२ - अरुणाचल प्रदेशात चिन्यांनी हिंदुस्थानच्या हद्दीत प्रवेश केला तरी पं. नेहरु आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन पडखाऊ धोरण सोडत नव्हते.6 / 10५) १९६७ - इंदिराजींनी काँग्रेस व सत्तेची सूत्रे हाती घेताच झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगाल, तमिळनाडुसह नऊ राज्यांत काँग्रेसविरोधी कौल मिळाला आणि इंदिरा विरोधकांच्या हाती कोलीत मिळाला.7 / 10६) १९७१ - इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा राजकीय नारा दिला, पण गरीब झोपडीत व राज्यकर्ते अंबारीत बसून फिरु लागले. गरिबी हटाव हे शेवटी ढोंगच राहीले.8 / 10७) १९८१ - बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या भूमिपुत्रांस असे चिरडले. देशाचा नकाशा विद्रुप केला.9 / 10८) मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाची आणि अस्मितेची जाणीव करुन देण्यासाठी.10 / 10९)१९८४ - शब्दाची गरज नाही. देश अंधारला. इंदिराजी गेल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications