sonam Wangchuk Comes Up With A Solar Powered Military Tent To Keep Our Army Men In Ladakh Warm
रिअल लाइफ 'रँचो'नं लडाखमधील सैनिकांसाठी बनवलं खास टेंट; बोचऱ्या थंडीत आता नो टेन्शन! By मोरेश्वर येरम | Published: February 20, 2021 10:36 PM1 / 6'थ्री इडिट्स' चित्रपटात 'रँचो' हे पात्र ज्या व्यक्तीवरुन रंगवण्यात आलं होतं ते समाजसेवक सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी भारतीय सैनिकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. 2 / 6इंजिनिअर सोनम वांगचूक यांनी लडाखच्या बोचऱ्या थंडीत आपल्या जीवाचीही पर्वा न करता देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसाठी एक खास टेंट तयार केला आहे. या टेंटचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 3 / 6सौरऊर्जेवर कार्यरत असणारे हे खास टेंट जवानांचं लडाखमधील बोचऱ्या थंडीपासून संरक्षण करणार आहेत. विशेष म्हणजे हे टेंट पूर्णपणे पोर्टेबल असून ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे आहेत. 4 / 6लडाखमध्ये वातावरण उणे २० अंश सेल्सियस इतकं जरी असलं तरी या टेंटमध्ये वातावरण १५ अंश सेल्सियस इतकं राखता येतं. यामुळे सैनिकांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे टेंट उपयोगी ठरणार आहेत. 5 / 6 सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टेंटचे फोटो ट्विट केले असून टेंटमधील तापमानाची माहिती देणारा एक फोटो देखील त्यांनी ट्विट केला आहे. त्यात टेंटमधील तापमान १५ अंश सेल्सियस इतकं असल्याचं दिसून येतं. 6 / 6सोनम वांगचुक यांनी तयार केलेले हे टेंट इतके मोठे आहेत की यात किमान १० जवान सहजपणे राहू शकतात. तर या टेंटचं वजन अवघ ३० किलो इतकं आहे. याशिवाय, यात सौरऊर्जेचा वापर केला जाणार असल्यानं ते पर्यावरणपूरक देखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications