शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचं सावट, तुफान गर्दी अन् भयंकर प्रदूषण; निष्काळजीपणा ठरेल घातक, सणासुदीत राहा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 3:11 PM

1 / 12
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. पण याच दरम्यान कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.
2 / 12
दिवाळी येताच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी आधीच कोरोनाची नवी लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे. कारण नवीन व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. कोरोनाचा वेग मंदावल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण अशा परिस्थितीत निष्काळजीपणा घातक ठरू शकतो.
3 / 12
अतिउत्साहीपणामुळे कोरोनाला आमंत्रण मिळू नये यासाठी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. सध्या अनेक जण मास्क शिवायच प्रवास करताना दिसतात. मात्र आता सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांनी सर्वत्र प्रचंड गर्दी केली आहे.
4 / 12
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट याच दरम्यान सापडल्याने पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे तज्ञ निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला देत आहेत. यासोबतच दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे कशी खबरदारी घेतली पाहिजे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
5 / 12
कोरोनाचे नवीन रूप पाहता आपण सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक राज्यांत मास्कची अट रद्द केली आहे. यापूर्वी दिल्लीत मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद होती.
6 / 12
सणासुदीच्या आनंदात कोरोनामुळे गडबड होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट भारतात आला आहे. BA 5.1.7 आणि BF .7 व्हेरिएंट आढळला आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे BF.7 सब व्हेरिएंटचे पहिले प्रकरण आढळले आहे.
7 / 12
संशोधन केंद्रानेच या प्रकारातील पहिल्या प्रकरणाची माहिती दिली आहे. आरोग्य तज्ञांनी नवीन व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. हा प्रकार चीनमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले. या नवीन प्रकाराची प्रकरणे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि बेल्जियममध्ये देखील नोंदवली गेली आहेत.
8 / 12
दिवाळीत गर्दीच्या वातावरणात कोरोना व्हायरस अगदी सहजपणे लोकांना आपल्या जाळ्यात ओढू शकतो. नवीन सब व्हेरिएंट फुल वॅक्सीनेट आणि चांगली इम्यूनिटी असलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो. निष्काळजीपणामुळे कोविड-19 ची पुढची लाट भारतात येऊ शकते हे नाकारता येणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 12
ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतात एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत, Omicron च्या नवीन XBB सब-व्हेरिएंटची 71 हून अधिक प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्राने XBB सब व्हेरिएंटच्या आणखी 5 प्रकरणांची पुष्टी केली. यापूर्वी, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये या सब व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.
10 / 12
गेल्या 15 दिवसांच्या कालावधीत, ओडिशात 33, बंगालमध्ये 17 आणि तामिळनाडूमध्ये 16 प्रकरणे नोंदवली गेली. XBB हे Omicron च्या BA.2.75 आणि BJ.1 प्रकारांच्या संयोजनाने बनलेले आहे. सिंगापूर आणि यूएसमध्ये ऑगस्टमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. कोरोना संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. हा व्हायरस नेमका किती गंभीर आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.
11 / 12
डब्ल्यूएचओने ओमायक्रॉनला 'चिंतेचा प्रकार' असे लेबल दिल्याने, त्याचे वंश आणि दुसऱ्या पिढीतील प्रकारांना समान वागणूक दिली जात आहे. भारतात जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये गुंतलेल्या शास्त्रज्ञांच्या मते, देशातील नवीन संक्रमणांपैकी सुमारे 88% BA.2.75 व्हेरिएंटमुळे होते, तर XBB सब व्हेरिएंट एकूण नवीन प्रकरणांपैकी फक्त 7% होते.
12 / 12
अहवालात डॉ. राजेश कार्यकर्ते, जीनोम सिक्वेन्सिंगचे समन्वयक, महाराष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार XBB हे Omicron चं एक हायब्रीड व्हर्जन आहे. सिंगापूरमध्ये, XBB सध्या इतर सर्व Omicron सब व्हेरिएंटवर वर्चस्व गाजवते. XBB जगाच्या अनेक भागांमध्ये आढळले आहे, परंतु सिंगापूरमध्ये ते खूप वेगाने वाढत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत