Spanish groups celebrating holi festivle in Pushkar
परदेशी चेहऱ्यांना देशी रंग, स्पेनच्या ग्रुपची रंगपंचमी By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 1:24 PM1 / 5देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. मात्र भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने रंगपंचमी खेळण्यासाठी येत असतात. यातील एक ठिकाण म्हणजे पुष्कर शहर, या शहरातील होळी देशभरात प्रसिध्द आहे.2 / 5ग्रुपमध्ये सहभागी असणा-या स्पेनच्या पर्यटकांनी फक्त रंगपंचमीचा आनंद लुटला नाही तर पुरुष पर्यटकांनी राजस्थानी पगडी आणि महिला पर्यटकांनी राजस्थानी साडी असा पेहराव देखील केला होता. 3 / 5पुष्कर येथे होळी खेळण्यासाठी स्पेनच्या पर्यटकांनी हजेरी लावली. या होळीच्या रंगात स्पेनचा ग्रुप न्हाऊन निघत एकमेकांवर रंगाची उधळण केली. त्याचसोबत हे क्षण कायम आठवणीत राहण्यासाठी सेल्फीही काढल्या. 4 / 5रंगाची उधळण केल्यानंतर स्पेन पर्यटकांनी केक कापून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय रंगात आणि देशाच्या संस्कृतीमध्ये एकरुप झालेले स्पेन पर्यटकांनी या सणाचा आनंद लुटला. 5 / 5रंगाची उधळण केल्यानंतर स्पेन पर्यटकांनी केक कापून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय रंगात आणि देशाच्या संस्कृतीमध्ये एकरुप झालेले स्पेन पर्यटकांनी या सणाचा आनंद लुटला. आणखी वाचा Subscribe to Notifications