शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 3:44 PM

1 / 6
लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनबद्दल तक्रारी येत आहेत. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएम मशीनला आणखी अपग्रेड करण्यात आलं आहे.
2 / 6
1989-90 मध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या, तेव्हा एका मशीनची किंमत ही (एक कंट्रोल युनिट, एक बॅलेटींग युनिट आणि एक बॅटरी) 5500 रुपये होती. ईव्हीएम मशीनचा खर्च बॅलेट पेपरच्या खर्चापेक्षा कमी आहे.
3 / 6
निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अनेक बैठकानंतर, परीक्षण केल्यानंतर आणि अनेकदा त्याची ट्रायल घेतल्यानंतरच स्वत:च्या ताब्यात घेतल्या आहेत.
4 / 6
यंदा ईव्हीएमवर सगळ्या उमेदवारांचे नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह असणारच आहे. पण, यासोबतच सगळ्या ईव्हीएमसोबत वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीनही आहे. तरीही, मतदारांकडून तक्रारी येत आहेत.
5 / 6
भारतात पहिल्यांदा नोव्हेंबर 1998 मध्ये 16 व्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. मध्य प्रदेशमध्ये 5, राजस्थानमध्ये 5, दिल्लीमध्ये 6 जागांवर पहिल्यांदा ईव्हीएमने मतदान झालं होतं.
6 / 6
ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 3840 मतं नोंदवले जावू शकतात. एका मतदान केंद्रावर 1500 मतदारचं मतदान करतात. त्याच्या आधारावर ईव्हीएम मशीनची संख्या ठरवली जाते.
टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग