शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; शिंदे गटाला मिळू शकते खास जागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:03 AM

1 / 8
मिशन 2024 च्या रणनीतीचा भाग म्हणून भाजप नेतृत्वाकडून संघटन स्तरावर मोठे बदल कले जात आहेत. याच आता केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर हा बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
2 / 8
केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारार जद (यू) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला जागा मिळू शकते. सध्या सरकारमध्ये सहकारी पक्षांचे फार कमी कॅबिनेट मंत्री आहेत. फेरबदल झाल्यास ही संख्या वाढू शकते.
3 / 8
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपती पारस कॅबिनेट मंत्री, अनुप्रिया पटेल आणि रामदास अठावले राज्य मंत्री यांचा समावेश आहे.
4 / 8
नुकताच राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि पुन्हा निवडून न आल्याने जदयूचे आरसीपी सिंह आणि भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे यांच्याकडे असलीली पदे सध्या रिक्त आहेत. यांपैकी पोलाद मंत्रालय ज्योतिरादित्य शिंदे आणि अल्पसंख्याक मंत्रालय स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आले आहे.
5 / 8
यातच, शिवसेनेचा शिंदे गट भाजपसोबत गेल्यानंतर आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर, त्यांनाही केंद्रात जागा मिळण्याची शक्यता आहे. असे करून, उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, 'आपणच खरी शिवसेना' असल्याचा दावा आणखी मजबूत केला जाऊ शकतो.
6 / 8
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींसह 29 कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच, दोन स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांसह 47 राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्रिमंडळात दोन स्वतंत्र प्रभार असलेल्या जितेंद्र सिंह आणि राव इंद्रजीत सिंह यांचा समावेश आहे.
7 / 8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात छोटा फेरबदल केला जाऊ शकतो. यात, साधारणपणे एक डझन मंत्री सामील होऊ शकतात अथवा याचा साधारणपणे एक डझन मंत्र्यांवर परिणाम होऊ शकतो.
8 / 8
महत्वाचे म्हणजे, सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांकडे तीन-तीन मंत्रालये आहेत. यांत पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी, सर्वानंद सोनोवाल, अश्विनी वैष्णव आणि जी किशन रेड्डी यांचा समावेश आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना