शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 8:24 AM

1 / 10
अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदीर उभारण्यासाठी मंदीर ट्रस्टकडून गतीमान हालचाली सुरू आहेत. मंदीर उभारणीसाठी फंड जमा करण्यापासून ते मंदीराचा विस्तार किती एकर जागेवर करायचा, इथपर्यंत सर्वकाही विचाराधीन आहे.
2 / 10
येथील राम मंदिराचा विस्तार आता 70 एकरवरुन 107 एकरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यासाठी, राम जन्मभूमी तिर्थक्षेत्रने राम जन्मभूमी परिसरात 7,285 वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे.
3 / 10
या जमिनीच्या खरेदीसाठी 1373 रुपये प्रति वर्ग फूटच्या दराने एक कोटी रुपयेही देण्यात आले आहेत.
4 / 10
श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आम्हाला आणखी जमीन आवश्यक आहे, त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे ट्र्स्टी अनिल मिश्रा यांनी सांगितले होते.
5 / 10
अशरफी भवनजवळ ही जमीन आहे. फैजाबादचे उप-विभागीय एसबी सिंह यांनी सांगितले की, जमिनीचे मालक दीप नरैन यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्याकडे 7285 वर्ग फूट जमिनीच्या दस्तावेजची नोंदणी केली आहे.
6 / 10
20 फेब्रुवारी रोजी हस्ताक्षरही झाले. मिश्रा आणि अपना दल पक्षाचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरीही केली. फैजाबादच्या उप-विभागीय नोंदणी कार्यालयात एसबी सिंह यांच्यासमोरच हा कागद करण्यात आला.
7 / 10
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पायाभरणीच्या कामाला गतीमान सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदकाम सुरू आहे.
8 / 10
बांधकाम तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मंदिराच्या पायाभरणीचं कामही आरसीसीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येत आहे. त्यासाठी, मोठी यंत्रणा कामाला लागली आहे.
9 / 10
परिसरातील 1 लाख 20 हजार स्वेअरफूट क्षेत्रात आत्तापर्यंत 4 परत सिमेंट क्राँक्रिटने घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकूण 45 ते 45 परत उभारण्यात येणार आहे.
10 / 10
अयोध्येतील राम मंदिराच्या कामासंदर्भात श्री राम जन्मभूमीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच, पायाभरणीच्या कामाचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरTempleमंदिरAyodhyaअयोध्या