शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:18 PM

1 / 14
काश्मीर खोरं सतत धगधगतं ठेवण्यासाठी सीमेपलिकडून कुरघोड्या सुरूच असतात. पाकिस्तानकडून या दहशतवाद्यांना नेहमीच पोसलं जातंय. शोपियानच्या पिंजौरा येथे सुरू असलेली चकमकीत दोन दिवसात हिज्बुल मुजाहिद्दीनचे नऊ दहशतवादी ठार करण्यात आले. त्यापैकी तीन अतिरेक्यांचे म्होरके म्हणजेच कमांडर होते.
2 / 14
गेल्या दोन आठवड्यात ९ मोठे ऑपरेशन झाले असून, जवळपास २२ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यामध्ये जवळपास ६ दहशतवाद्यांचे म्होरके होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे.
3 / 14
शोपियानमध्ये आज पहाटे तीन वाजता सुरू झालेल्या ४ तासांच्या कारवाईत ४ दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांना नागरिकांचा छळ करणे, स्थानिक नसलेल्या मजुरांना ठार मारणे, पोलिसांचे अपहरण करणे, ट्रक चालकांना त्रास देणे आणि जखमी करण्यासाठी ओळखले जात होते, अशी माहिती सेनगुप्त सैन्याच्या व्हिक्टर फोर्सचे जीओसी मेजर जनरल ए यांनी दिली आहे.
4 / 14
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्या म्हणण्यानुसार, लष्करानं जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्ध सफाई मोहीम सुरूच ठेवली आहे. गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराने काश्मीर खो-यात 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
5 / 14
दोन दिवस चाललेल्या कारवाईत हिज्बुल मुजाहिद्दीनचे नऊ दहशतवादी ठार झाले आहेत, त्यापैकी तीन अतिरेकी कमांडरस्तराचे लोक आहेत. गेल्या दोन आठवड्यांत 9 मोठे ऑपरेशन झाले, ज्यामध्ये एकूण 22 दहशतवादी ठार झाले, त्यापैकी 6 शीर्ष कमांडर आहेत.
6 / 14
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धच्या या मोठ्या मोहिमेमुळे काश्मीर खोरे हे दहशतवादमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे डीजीपी जम्मू-काश्मीर दिलबाग सिंह यांनी सांगितले. गेल्या 24 तासांत ठार झालेले 9 दहशतवादी हे याचे उत्तम उदाहरण आहे.
7 / 14
या 22 दहशतवाद्यांपैकी 18 जण दक्षिण काश्मीरमध्ये वास्तव्याला होते. तीन जिल्ह्यांत ते सक्रिय होते. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी पुलवामा, कुलगाम, शोपियान आणि एक अवंतीपोरा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जम्मूच्या राजौरी पुंछ भागात 2 ऑपरेशन्समध्ये घुसखोरी केलेले 3 अतिरेकी ठार झाले.
8 / 14
काल दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या या कारवाईत दोन लष्कराचे जवानही जखमी झाले आहेत. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे. घुसखोरीचे प्रयत्न लक्षात घेता सैन्य काश्मीर खोऱ्यात काही काळापासून कारवाई करीत असून, त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये सैन्याने मोठे यश संपादन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये 4 दहशतवादी ठार झाले.
9 / 14
शोपियानमध्ये गेल्या 24 तासांत 9 दहशतवादी ठार झाले आहेत. शोपियानच्या पिंजौरा येथे सुरू असलेली चकमक अखेर संपली. सोमवारी चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हे चौघेही हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी होते. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
10 / 14
उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करत आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानकडून सुरू असलेली कुप्रसिद्ध कृत्ये विफल ठरत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.
11 / 14
एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर कुलगाम आणि शोपियान जिल्ह्यांमधील मोबाइल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत हिज्बुल कमांडरसह पाच अतिरेकी सैन्य दलाने शहीद झाले. नऊ तासांच्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 रायफल, दोन पिस्तूल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
12 / 14
गेल्या 12 दिवसांपासून हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा एक गट नागरिकांना ठार मारत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सकाळी सुरक्षा दलाने कारवाई करून हिज्बुल मुजाहिद्दीनच्या 5 अतिरेक्यांना ठार केले.
13 / 14
शुक्रवारी यापूर्वी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील सोपोर आणि हंदवाडा भागातून लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या चार सक्रिय सदस्यांना अटक केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागातील शालपोरा गावात शोध मोहीम राबविण्यात आली.
14 / 14
. यावेळी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, आझाद अहमद भट आणि अल्ताफ अहमद बाबा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.
टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला