शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'शिक्षण विकण्यासाठी नसतंय वो', JNU चे विद्यार्थी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:28 AM

1 / 8
वसतिगृहांमधील फीमध्ये केलेली वाढ रद्द करावी या मागणीसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय.
2 / 8
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर लाठीमार करून पोलिसांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत केला.
3 / 8
तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे टी.एन. प्रथपन, बसपचे दानिश अली यांनी हा विषय लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. केंद्र सरकार उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची धुळधाण उडवत आहे.
4 / 8
जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी या खासदारांनी केली असून विरोधकांनीही सरकारला लक्ष्य केलंय
5 / 8
जेएनयू विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशन गड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १८६ आणि ३५३ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 / 8
दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा विद्यापीठाजवळ रोखून ठेवण्यात आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांनी रस्त्यावर उभारलेले बॅरीकेट्स तोडून पुढे येण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.
7 / 8
पोलिसांना आंदोलनकर्त्या विद्यर्थ्यांवर केलेल्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यानंतर, विद्यार्थी आक्रमक झाले असून देशभरात पडसाद उमटत आहेत
8 / 8
जेएनयुतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत असून पुणे विद्यापीठातूनही या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला
टॅग्स :delhiदिल्लीStudentविद्यार्थीlok sabhaलोकसभाagitationआंदोलन