शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: यशस्वी कहाणी! नोकरीसह UPSC ची तयारी; मेहनतीच्या जोरावर स्तुती चरण झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 3:18 PM

1 / 11
UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. पहिल्याच प्रयत्नात यामध्ये यश मिळवणारे फार कमी लोक आहेत. जरी एखाद्याने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, तरीही त्यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणे खूप कठीण असते.
2 / 11
या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक उमेदवार खूप मेहनत घेत असतात. तर काही जण पहिल्याच प्रयत्नात पास होतात. स्तुती चरण ही अशीच एक टॉपर आहे, जिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. IAS टॉपर स्तुती चरण यांनी 2012 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.
3 / 11
IAS अधिकारी होण्यापूर्वी स्तुती चरण यांनी एका बँकेत ऑफिसर म्हणून काम केले होते. मात्र, त्यांन देशसेवा करायची होती त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. मग त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
4 / 11
आपली स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी बसण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही खडतर परीक्षा तर उत्तीर्ण केलीच, पण सर्वोत्तम रँकही मिळवली.
5 / 11
स्तुती चरण यांनी यूपीएससी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवला. लहानपणापासूनच IAS होण्याची इच्छा असलेल्या स्तुती यांनी त्यांचे शालेय शिक्षण राजस्थानमधील भीलवाडा येथून पूर्ण केले.
6 / 11
त्यानंतर त्यांनी लाचू मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर आयआयपीएम, नवी दिल्ली येथून कार्मिक आणि विपणन व्यवस्थापन विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पूर्ण केला. पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी नागरी सेवेची तयारी सुरू केली.
7 / 11
रिसेप्शनिस्ट ते आयपीएस, विदेशातील नोकरीला नकार, UPSC क्रॅक करणे हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. एका मुलाखतीत स्तुती यांनी म्हटले की, त्या लहानपणापासूनच स्वत:ला आयएएस म्हणून पाहण्याच्या आशेने मोठ्या झाल्या आहेत.
8 / 11
प्रत्येक यशोगाथा प्रेरणा देत असते असा त्यांचा समज आहे. स्वतःला प्रेरित करण्यासाठी त्या नेहमी टॉपर्स विद्यार्थाच्या कथा वाचायच्या. यातूनच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्या सांगतात.
9 / 11
स्तुती चरण यांनी 2012 मध्ये त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. खरं तर तेव्हा त्या नोकरी देखील करत होत्या.
10 / 11
त्या काळात त्या युको बँकेत ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. यामध्ये त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता. सध्या त्या गुजरातमधील छोटा उदयपूर येथे सेवेसाठी तैनात आहेत.
11 / 11
दरम्यान, राजस्थानमधील जोधपूर येथे जन्मलेल्या स्तुती यांचा आयएएस कुटुंबातच जन्म झाला होता. त्यांचे वडील राम करण बरेथ हे राजस्थान स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि आई सुमन व्याख्याता आहे. स्तुती यांची लहान बहीण निती ही डेंटिस्ट आहे. त्यांचे वडील 1974 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते.
टॅग्स :Rajasthanराजस्थानupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी