subrata pati teacher climbs tree to teach students to beat internet hurdle SSS
Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:59 AM1 / 12भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 12कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.3 / 12जीवनावश्यक सेवा वगळता उतर सर्व गोष्टी बंद आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.4 / 12लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. 5 / 12विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवताना अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पश्चिम बंगालमधील एका शिक्षकाने थेट झाडावरूनच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला.6 / 12सुब्रत पाती असं या पश्चिम बंगालच्या शिक्षकाचं नाव असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते रोज झाडावर चढतात. तिथे रेंज चांगली येत असल्याने त्यांनी बसण्यासाठी जागा तयार केली आहे. 7 / 12सुब्रत पाती हे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील शिक्षण संस्थेमध्ये इतिहास विषय शिकवतात.8 / 12लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं हा त्यांना प्रश्न पडला होता. ऑनलाईन शिकवताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. 9 / 12सुब्रत यांना झाडावर जाऊन शिकवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी झाडावर रेंज येईल अशा ठिकाणी बसून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. 10 / 12रोज ठरलेल्या वेळेत ते या झाडावर येऊन पोहोचतात आणि आपला क्लास सुरू करून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात.11 / 12सुब्रत यांनी ऑनलाईन क्लासला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.12 / 12सुब्रत यांचे झाडावरचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. (फोटो - biswabanglasangbad.com आणि ANI) आणखी वाचा Subscribe to Notifications