success story anukriti sharma became ips to stop child marriage
सायंटिस्ट व्हायचं होतं पण झाली IPS; मुलीवर अन्याय होताच 'तिने' स्वप्नांऐवजी निवडलं मिशन By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 5:15 PM1 / 12प्रेरणादायी गोष्टी या सातत्याने समोर येत असतात. अनुकृती शर्मा या तिसर्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. सायंटिस्ट होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनुकृती यांनी एका मुलीवर अन्याय होताना पाहिला. बालविवाहामुळे त्यांनी आपला विचार बदलला. 2 / 12बालविवाह पाहून अनुकृती यांचे मन दु:खी झाले आणि मग त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनत करूनही पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात आयआरएस झाला. काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी तिसर्याच प्रयत्नात 2020 मध्ये त्या आयपीएस झाल्या. 3 / 12अनुकृती शर्मा सध्या उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे आयपीएस आहेत. यानंतर त्यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. IPS अनुकृती शर्मा यांनी बालविवाहाची माहिती मिळवण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे.4 / 12‘पोलीस माय फ्रेंड’ या उपक्रमांतर्गत गावोगावी जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की, यामध्ये आम्ही गावातील लोकांना महिला आणि मुलींसोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची जाणीव करून देऊ लागलो आणि कौटुंबिक हिंसाचार झाल्यास कारवाई केली. 5 / 12गावातील महिला व मुलींवरील गुन्ह्यांव्यतिरिक्त जुगार, सट्टा, दारू, गांजा यासह इतर गुन्हे बंद करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या नोकरीतील कर्तव्य पार पाडण्याबरोबरच त्या गावागावात जाऊन जनजागृती करण्यासाठी वेळ काढतात.6 / 12गावातील लोकांची अनेकदा तक्रार असते की पोलीस ऐकत नाहीत, पण आयपीएस अनुकृती सांगतात की, आम्ही तुमचे ऐकण्यासाठी तुमच्या गावात आलो आहोत. तुझा प्रॉब्लेम काय आहे ते सांगा. अनुकृती यांच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळत आहे. 7 / 12अनुकृती यांच्या कॉलेजच्या बाहेर एक चहाचे दुकान होते आणि त्या चहाच्या दुकानाच्या मालकाला एक 15 वर्षांची मुलगी होती. या मुलीचे लग्न एका 30 वर्षीय पुरुषाशी लावले. यानंतर बालविवाह पाहून अनुकृती शर्माने लोकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला. सायंटिस्ट व्हायचं होतं पण न्यायासाठी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.8 / 12अनुकृती यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1987 रोजी राजस्थानमधील अजमेर येथे झाला. इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण त्यांनी जयपूर येथे घेतले. त्यानंतर त्यांनी बॅचलर डिग्री मिळवली. त्यानंतर 2012 मध्ये पीएचडी करण्यासाठी अमेरिका गाठली आणि अमेरिकेतील ह्यूस्टन येथील राइस युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करायला सुरुवात केली.9 / 12पीएचडी पूर्ण करण्यापूर्वी अनुकृती शर्मा यांनी मन देशाकडे वळले आणि आता देशासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने पीएचडीचे शिक्षण सोडले. त्यानंतर भारतात परतल्या आणि 2014 मध्ये NET JRF परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि 23 वा क्रमांक मिळवला. तर या परीक्षेत त्यांचे पती वैभव मिश्रा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 10 / 12बनारस येथे सासरच्या घरी राहून पतीसोबत नागरी सेवेची तयारी सुरू केली. अनुकृती शर्मा यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नात IRS झाल्या. पुन्हा तिसरा प्रयत्न केला आणि 2020 मध्ये आयपीएस झाल्या. यानंतर बालविवाह आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. 11 / 12अनुकृती यांचे आई-वडील सरकारी नोकरीत होते. वडील संचालक होते आणि आई शिक्षिका आयपीएस होण्यासाठी भाऊ खूप साथ देत असे. तर अनुकृती यांनी कधीही कोचिंग घेतले नाही आणि ती काही ऑनलाईन मटेरियल आणि मेहनतीने आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12अनुकृती यांचे आई-वडील सरकारी नोकरीत होते. वडील संचालक होते आणि आई शिक्षिका आयपीएस होण्यासाठी भाऊ खूप साथ देत असे. तर अनुकृती यांनी कधीही कोचिंग घेतले नाही आणि ती काही ऑनलाईन मटेरियल आणि मेहनतीने आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications