शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभियंता ते IPS अधिकारी! अंशिका वर्मा यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा; दुसऱ्याच प्रयत्नात गड सर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 8:07 PM

1 / 9
आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा यांनी तरूण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेडमधील (UPEL) निवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. आई-वडिलांचा पाठिंबा अन् जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशस्वी झेप घेतली.
2 / 9
UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. पहिल्याच प्रयत्नात यामध्ये यश मिळवणारे फार कमी लोक आहेत. जरी एखाद्याने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, तरीही त्यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणे खूप कठीण असते.
3 / 9
IPS अधिकारी अंशिका वर्मा यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा आहे. अंशिका वर्मा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. त्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत.
4 / 9
अंशिका यांनी २०२० मध्ये दुसऱ्या प्रयत्नात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय UPSC परीक्षा पास केली. परीक्षेसाठी त्यांचा पहिला प्रयत्न २०१९ मध्ये होता, त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी ही परीक्षा देण्याचे ठरवले.
5 / 9
त्यांनी प्राथमिक शिक्षण नोएडा येथे घेतले आणि २०१४ ते २०१८ मध्ये गलगोटियास कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, नोएडा येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी पूर्ण केली.
6 / 9
UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी त्यांचा प्रवास प्रयागराज येथूनच सुरू झाला. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठ्या आव्हानांवर मात करत दुसऱ्या प्रयत्नात UPSC CSE परीक्षेत १३६ वी रँक मिळवली.
7 / 9
अंशिका या सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) मधून निवृत्त कर्मचारी आहेत, तर आई गृहिणी आहे.
8 / 9
IPS अंशिका वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या नेहमी नवनवीन गोष्टी शेअर करून युवकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात.
9 / 9
IPS अंशिका वर्मा यांचा अभियंता ते IPS अधिकारी होण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांची यशोगाथा आजही अनेकांना या कठीण परिक्षेचा सामना करण्यासाठी ऊर्जा देते.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी