success story of ias gamini singala who crack upsc with rank 3 by self study
कौतुकास्पद! UPSC च्या तयारीसाठी वडील वाचून दाखवायचे वृत्तपत्र; आता लेक झाली IAS अधिकारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:22 AM1 / 11काही उमेदवार UPSC नागरी सेवा परीक्षेत (UPSC CSE) शेवटच्या अटेम्प्टपर्यंत बसतात. पण यश हातात पडताना दिसत नाही. काही लोक त्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच UPSC क्रॅक करतात. पण प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. 2 / 11अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आयएएस गामिनी सिंगला यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण तर केलीच पण टॉपर्सच्या यादीतही आपले नाव नोंदवले. आयएएस गामिनी सिंगला यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...3 / 11IAS गामिनी सिंगला या पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील रहिवासी आहेत. 2021 मध्ये घरी राहून सेल्फ स्टडी करून त्यांनी UPSC उत्तीर्ण केली. गामिनी सिंगला यांचे आई-वडील अशोक सिंगला आणि नीरज सिंगला हे दोघेही डॉक्टर आहेत.4 / 11गामिनी यांनी चंदीगड येथील पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज येथून कॉप्युटर सायन्स इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. त्यांचा भाऊ तुषार सिंगला यानेही आयआयटी खरगपूरमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. गामिनी यांनी पदवीनंतर यूपीएससीची तयारी सुरू केली.5 / 11यूपीएससी मेन्समध्ये त्यांनी पर्यायी विषय म्हणून समाजशास्त्र निवडलं. तिला पहिल्याच प्रयत्नात प्रीलिम्सची परीक्षाही पास करता आली नाही. पण दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया तिसरा रँक मिळवून ती आयएएस झाली.6 / 11गामिनी सिंगला यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्या दररोज नऊ ते 10 तास अभ्यास करायच्या. या काळात त्यांचे वडील त्यांच्यासाठी वर्तमानपत्र वाचायचे. यानंतर ते गामिनीशी बातम्यांवर चर्चा करत असे. त्यामुळे गामिनी यांचा वर्तमानपत्र वाचण्याचा वेळ वाचला.7 / 11गामिनी यांनी आयएएस झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी 'How I Topped the UPSC and How You Can Too' हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 11गामिनी यांनी आयएएस झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी 'How I Topped the UPSC and How You Can Too' हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 11गामिनी यांनी आयएएस झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी 'How I Topped the UPSC and How You Can Too' हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 11गामिनी यांनी आयएएस झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी 'How I Topped the UPSC and How You Can Too' हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 11गामिनी यांनी आयएएस झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी 'How I Topped the UPSC and How You Can Too' हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या तयारीची माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications