success story of IAS Saumya Pandey, CDO Kanpur Dehat
कर्तव्यनिष्ठेला सलाम! 22 दिवसांच्या लेकीसह हजर; IAS होऊन निभावतेय आईची जबाबदारी By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 12:01 PM1 / 16कानपूर देहातच्या सीडीओ सौम्या पांडे या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. ऑफिसमध्ये असलेल्या मोठ्या जबाबदारीसोबतच त्य़ा त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचीही पूर्ण काळजी घेत आहे. ऑफिस आणि घर ही दोन्ही कर्तव्य अगदी नीट पार पाडत आहेत. जाणून घेऊया... IAS सौम्या पांडे यांची यशोगाथा.2 / 16IAS सौम्या पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) येथे झाला. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले आहे. सौम्या पांडे 10वी मध्ये 98% आणि 12वी मध्ये 97.8% मिळवून तिच्या जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. 3 / 162015 मध्ये त्यांनी MNNIT अलाहाबाद येथून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ब्रांचमध्ये B.Tech केले. येथेही त्यांनी अव्वल स्थान पटकावले तसेच त्या गोल्ड मेडलिस्टही आहेत. सौम्या पांडे यांनी इंजिनीअरिंग केल्यानंतर एक वर्षाचा ब्रेक घेऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. 4 / 16वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चौथ्या क्रमांकासह (UPSC टॉपर) त्या अव्वल आल्या आहेत. त्यांच्याकडे एनसीसी बी आणि सी श्रेणी प्रमाणपत्रे आहेत. शास्त्रीय नृत्यात पारंगत असण्यासोबतच त्या बास्केटबॉलमधील उत्कृष्ट खेळाडू आहेत.5 / 16IAS सौम्या पांडे यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून गुरु उर्मिला शर्मा यांच्याकडून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी भरतनाट्यमपासून ते मणिपुरीपर्यंत शास्त्रीय नृत्याचे अनेक प्रकार शिकले आहेत. 6 / 16सौम्या यांची आई डॉ. साधना पांडे आणि वडील डॉ. आर के पांडे यांनी त्यांना खूप साथ दिली. IAS सौम्या पांडे यांच्या डान्सचे सुंदर व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. सौम्या पांडे सध्या कानपूर देहात CDO म्हणून तैनात आहेत. 7 / 162020 मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर 22 व्या दिवशी कार्यालयात रुजू झाल्या होत्या. वास्तविक, त्यावेळी कोविड 19 मुळे परिस्थिती बिघडत होती आणि अशा परिस्थितीत त्यांना प्रसूती रजेवर जाणे योग्य वाटत नव्हते. 8 / 16योगी सरकारनेही त्यांचे खूप कौतुक केले होते. सौम्या पांडे यांचा नवजात मुलीला हातात घेऊन ऑफिसचे काम करतानाचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला होता. सौम्या त्यांची रणनीती UPSC उमेदवारांसोबत शेअर करत असते.9 / 16यूपीएससी पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी टेस्ट सीरीज खूप महत्त्वाच्या असतात. यामुळे तयारी नीट होते आणि चुका कळतात असं देखील सौम्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)11 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)12 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)13 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)14 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)15 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया)16 / 16(सर्व फोटो - सोशल मीडिया) आणखी वाचा Subscribe to Notifications