जिल्हा परिषदेत शिक्षण ते IAS ऑफिसर म्हणून सिलेक्शन; अनेकांसाठी प्रेरणादायी ठरताहेत सुरभी गौतम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 12:12 IST
1 / 12जिल्हा परिषदेत शिक्षण, इंग्रजीवर फारसं प्रभुत्व नसल्यानं सहन करावी लागणारी हेटाळणी यामुळे डगमगून न जाता पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालेल्या सुरभी गौतम यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 2 / 12मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातल्या अमदरा गावात शिकलेल्या सुरभी यांनी दहावी, बारावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. 3 / 12आपल्याला पुढे आयएएस व्हायचंय अशी खूणगाठ सुरभी यांनी दहावी उत्तीर्ण होताच मनाशी बांधली. 4 / 12सुरभी यांचे वडील मैहर सत्र न्यायालयात वकील असून त्यांची आई सुशीला शिक्षिका आहे. त्यांनी सुरभीला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं. शिक्षणासाठी शहरात गेलेली सुरभी गावातली पहिली मुलगी होती.5 / 12शहरात आलेल्या सुरभी यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. इंग्रजीत संवाद साधण्याची सवय नसल्यानं त्यांना मोठ्या अडचणी आल्या.6 / 12इंग्रजी बोलता येत नसल्यानं वर्गात सुरभी यांची टिंगल केली जायची. सर्व विषयांत पहिल्या येणाऱ्या सुरभी यांना इंग्रजी विषय अतिशय कठीण जायचा.7 / 12सुरभी यांनी इंजिनीयरिंगची प्रवेश परीक्षा दिली. त्यात त्यांना अतिशय चांगले गुण मिळाले. त्यामुळे सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरभी यांनी भोपाळमधल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समधून इंजिनीयरिंग केलं.8 / 12विद्यापीठात अव्वल स्थान मिळवलेल्या आणि सुवर्ण पदक विजेत्या सुरभी यांनी २०१६ मध्ये आयएएस परिक्षेत ५० वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आयएसएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या.9 / 12विशेष म्हणजे आएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी भाभा अणू संशोधन केंद्रात वर्षभर काम केलं. 10 / 12सुरभी यांनी दिलेल्या आणि यश मिळवलेल्या परिक्षांची यादी बरीच मोठी आहे. गेट, इस्रो, सेलमध्ये त्यांची निवड झाली होती. इस्रोनं घेतलेल्या परिक्षेत तर त्या देशात दुसऱ्या आल्या होत्या. 11 / 12सुरभी यांनी एमपीपीएससी प्री, एसएससी एलजीएल, दिल्ली पोलीस आणि एफसीआय परिक्षांमध्येही नेत्रदीपक यश मिळवलं. २०१३ मध्ये झालेल्या आयईएस परिक्षेत त्या देशात पहिल्या आल्या होत्या.12 / 12आयईएस परिक्षेत देशात प्रथ क्रमांक पटकावल्यानंतर त्यांनी आयएएस परिक्षेची तयारी सुरू केली. या परिक्षेत पहिल्याच फटक्यात त्यांनी मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय.