मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केलेल्या मंगळयानाने पाठवलेले मंगळ ग्रहाचे पहिले छायाचित्र..या मोहीमेद्वारे भारताला मंगळ ग्रहाविषयी संशोधन करता येणार आहे. तसेच मंगळ ग्रहाची छायाचित्रेही भारताला मिळणार आहेतआजचा क्षण ऐतिहासिक असून इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्त्रोच्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित होते. मोहीम फत्ते झाल्याचे स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले.पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश बनला आहे. तसेच मंगळ मोहीम पूर्ण करणा-या अमेरिका रशिया युरोपीय महासंघ या देशांच्या रांगेत आता भारताचाही नंबर लागला आहे.३०० दिवसांमध्ये सुमारे ६६६ दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापून मंगळयानाने बुधवारी यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.मंगळावर संशोधन करण्यासाठी इस्त्रोने मार्स ऑर्बिटर मिशन ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेअंतर्गत ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील पीएसएलव्ही सी -२५ च्या मदतीने मंगळयान प्रक्षेपित करण्यात आले होते.पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याची किमया साधत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ मोहीमेच्या इतिहासात सुवर्ण अध्यायाची नोंद केली. बुधवारी सकाळी मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला असून पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.