Successful test of Pushpak aircraft by ISRO, these are the features
ISROकडून पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी, अशी आहेत वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:56 PM1 / 7भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे पुष्पक विमानाला यशस्वीरीत्या जमिनीवर उतरवले. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 2 / 7इस्रोचे हे पुष्पक विमान म्हणजे एका कारच्या आकाराचे पंख असलेले रॉकेट आहे. त्याला स्वदेशी अंतराळ यान असेही संबोधले जात आहे. हे पुष्पक विमान पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेटच्या क्षेत्रात यश मिळवण्याच्या दिशेने भारताने टाकलेले यशस्वी पाऊल मानले जात आहे. 3 / 7 पुष्पक रॉकेटचं हे तिसरं उड्डाण होतं. २०१६ मध्ये पुष्पकची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याला बंगालच्या उपसागरातील एका व्हर्च्युअल धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. मात्र ते समुद्रात बुडाले होते. दुसरी चाचणी २०२३ मध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी पुष्पकला चिनूक हेलिकॉप्टरमधून ड्रॉप करण्यात आले होते. मात्र हे विमान पूर्णपणे कार्यान्वित होण्यास अजून अनेक वर्षे लागण्याची शक्यता आहे. 4 / 7या विमानाची खास वैशिष्टे म्हणजे हे पुष्पक विमान ६.५ मीटर लांब आणि १.७५ टन वजनाचे विमानासारखे दिसणारे रॉकेट आहे. अंतराळात पाठवण्याच्या उद्देशाने ते तयार करण्यात आले आहे. हे पुष्पक विमान रॉकेटसह अंतराळात पाठवता येऊ शकते. 5 / 7अंतराळातील मोहीम पूर्ण केल्यानंतर जेव्हा हे रॉकेट पृथ्वीवर येईल तेव्हा यात एक लहानसा थ्रस्ट दिला जाऊ शकतो. त्या माध्यमातून हे यान तिथेच लँड करेल जिथे इस्रोकडून त्याचे लँडिंग नियोजित केलेले असेल. 6 / 7या प्रकल्पावर केंद्र सरकारकडून सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भविष्यातील मोहिमांवर होणार खर्च कमी करण्यासाठी पुनर्वापर करणारी रॉकेट विकसित करणे हा सरकारचा यामागचा उद्देश आहे. 7 / 7पुष्पक रॉकेटचा वापर भविष्यामध्ये पृथ्वीभोवती फिरत असलेल्या उपग्रहांचं रिफ्युलिंग करण्यासाठीही करता येईल. तसेच अंतराळातील कचरा कमी करण्याच्या भारताच्या मोहिमेचाही हे रॉकेट महत्त्वाचा भाग असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications