Such is the powerful helicopter 'Chinook'
असे आहे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेले शक्तिशाली हेलिकॉप्टर 'चिनूक' By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 3:58 PM1 / 7अवजड साहित्य आणि युद्धसामुग्री वाहून नेण्यास सक्षम असलेलेे शक्तिशाही हेलिकॉप्टर चिनुक आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. 2 / 7भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंदिगड एअरबेसवर चार चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्याता आले. 3 / 7 दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. 4 / 7चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात.5 / 7सर्वप्रथम 1962 मध्ये चिनूक हेलिकॉप्टर वापरात आणले गेले होते. तेव्हापासून या हेलिकॉप्टर्सच्या तंत्रज्ञानात खूप बदल झालेला आहे. 6 / 7व्हिएतनाम युद्धापासून अफगाणिस्तान आणि इराक युद्धापर्यंत अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा अमेरिकेने प्रभावी वापर केला होता. 7 / 7 भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर दाखल झाल्याने हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. दुर्गम मार्ग आणि सीमारेषेवर बांधकाम प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये ही हेलिकॉप्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications