अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 10:01 IST
1 / 10नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आज मध्यरात्री भीषण घटना घडली आहे. स्थानकावर मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन १८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.2 / 10या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून यातून घटनेची भीषणता स्पष्ट होत आहे.3 / 10चेंगराचेंगरी होऊ लागल्यानंतर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजणच घाबरले आणि वाट मिळेल तिकडे धावू लागले4 / 10संपूर्ण स्थानक परिसरात चप्पलांचा खच पडल्याचं दिसत असून कपड्यांचाही ढीग पाहायला मिळाला.5 / 10चेंगराचेंगरीनंतर जखमी झालेले अनेक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत खाली पडले होते. 6 / 10अनेक जण आपल्या कावरेबावरे होऊन आपल्या नातेवाईकांना शोधत होते.7 / 10नातेवाईकांचे मृतदेह पाहून प्रवाशांनी केलेल्या आक्रोशाने रेल्वे स्थानक परिसर सुन्न झाला.8 / 10काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत जखमींची मदत करण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एका महिलेला काही जण सीपीआर देताना पाहायला मिळाले.9 / 10'प्रयागराज एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक १४ वर उभी असताना, प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी या गाड्या उशिरा होत्या. या गाड्यांचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक १२,१३ आणि १४ वर होते. रेल्वेने दर तासाला १५०० जनरल तिकिटांची विक्री केली. यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली,' अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.10 / 10 दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेकडून पीडितांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.