शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 5:27 PM

1 / 9
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती! स्वतंत्र व्यवसायाचे वेड डोक्यात घेतलेल्या आपल्या नवऱ्याला दहा हजार रुपयांचे पहिले भांडवल आणि संसारिक खर्चातून काही काळ सुटका त्यांनीच तर दिली होती. मराठी वाचक सुधाताईंना ओळखतो तो लोभस स्वभावाच्या ख्यातनाम लेखिका आणि अपरंपार संपत्तीचा तीळमात्रही परिणाम होऊ न देता मध्यमवर्गीय मूल्ये जपणारी एका स्नेहशील स्त्री म्हणून! त्यांच्या आयुष्यातले हे महत्वाचे टप्पे
2 / 9
१९६८ साली १५० मुलांच्या बॅचमधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करणारी पहिली आणि एकटी मुलगी होती. ती मुलगी म्हणजेच सूधा मूर्ती.
3 / 9
१९७४ साली स्त्रियांनी अर्ज करू नयेत या जाहिरातील आक्षेप घेऊन थेट जेआरडी टाटांना पत्र लिहिले. टाटा मोटर्समध्ये पहिली स्त्री इंजिनिअर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
4 / 9
आज तब्बल ८० अब्ज डॉलर्स मूल्य असलेली इन्फोसिस कंपनी सुरू करण्यासाठी नारायण मूर्ती यांना दहा हजार रुपयांचे पहिले भांडवल १९८१ साली सूधा मूर्ती यांनीच दिले होते.
5 / 9
१९९६ साली शिक्षण, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात कामासाठी इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापन केली.
6 / 9
२००५ साली सुधा मूर्ती यांचे मुलांसाठीचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते. २००६ साली त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं.
7 / 9
२०१२ साली सुधा मूर्ती यांनी एका कन्नड सिनेमातही काम केलं. तर २०१५ साली अक्षयपात्र योजनेद्वारे शालेय मुलांच्या माध्यान्ह भोजनासाठी १५० कोटी रुपयांची देणगी त्यांनी दिली
8 / 9
२०२१ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनमधून निवृत्ती घेतली. ११०० कोटी रुपयांचे दान केले. तसंच ६०,००० वाचनालये आणि १६,००० स्वच्छतागृहांची उभारणी सुधा मूर्ती यांनी केली आहे.
9 / 9
२०२३ मध्ये सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
टॅग्स :Sudha Murtyसुधा मूर्ती