The sun rises for the first time in the country, in this 'state' only at 3 o'clock!
देशातील 'या' राज्यात उगवतो पहिल्यांदा सूर्य, रात्री 3 वाजताच पडतात किरणं! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 4:02 PM1 / 6सूर्याला नमस्कार केल्याशिवाय सकाळच उजाडत नाही. सूर्योदयाचं दृश्य तर विलोभनीय असंच असतं. 2 / 6लाल आणि पिवळ्या आकाशासोबत जेव्हा सूर्याची चमकदार किरणे जमिनीवर पडतात, तेव्हा स्वर्गाची अनुभूती येते. देशात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो. 3 / 6 या प्रदेशाच्या नावातूनच हे स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी मानलं जातं. या प्रदेशातील लहान ठिकाण डोंग व्हॅलीमध्ये सर्वातआधी सूर्य उगवताना पाहिला जाऊ शकतो. 4 / 6 सूर्याचा प्रकाश आणि किरणांची लाल रंगाची चादर डोंग व्हॅलीमध्ये रात्री 3 वाजल्यापासून बघायला मिळते. लोहित नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.5 / 61999मध्ये या गोष्टीचा शोध लावण्यात आला होता की, भारतात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग व्हॅलीमध्ये होतो. 6 / 6चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि निळ्या आकाशावर पसरलेल्या सूर्यांच्या रंगात रंगलेले लाल-पिवळे ढग डोळे दिपवणारा नजारा असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications