शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sunil Kanugolu: प्रशांत किशोर नाही आले, मग काय झाले; काँग्रेसने जुना सहकारीच फोडला, दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 6:28 PM

1 / 7
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला पुन्हा संजिवनी देण्याचे काम सुरु आहे. यासाठी रणनितीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न झाले. पण कुठेतरी माशी शिंकली आणि प्रशांत किशोर यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील महत्वाचा सहकारीच आपल्याकडे खेचला आहे. त्याला मोठी जबाबदारी देखील दिली आहे.
2 / 7
गेल्या आठवड्यापासून जयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. यामध्ये वेगवेगळ्या टीम, टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. या टीम दर ७२ तासांनी बैठका करणार आहेत. या टीममध्ये जुने जाणत्या नेत्यांसोबत काही नवीन चेहरेही आहेत. परंतू त्यातले त्यात चर्चेत असलेले नाव हे सुनील कोनगोलु यांचे आहे. कोनगोलु यांचा थेट संबंध प्रशांत किशोर यांच्याशी आहे.
3 / 7
सुनील कोनगोलु यांचे नाव येताच काँग्रसचे पदाधिकाराही अचंबित झाले. कोनगोलु कोण हे फक्त कर्नाटकच्याच नेत्य़ांना माहिती होते. बाकी सारे अनभिज्ञ होते. यामुळे सुरजेवाला यांनी कोनगोलु हे प्रशांत किशोर यांचे जुने सहकारी आणि काँग्रेसमध्ये आहेत हे जाहीर केले.
4 / 7
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, अजय माकन, प्रियांका गांधी, रणदीप सुरजेवाला, सुनील कोंगोलू यांचा समावेश करण्यात आला आहे. टास्क फोर्सच्या प्रत्येक सदस्याला संघटना, संवाद आणि माध्यम, वित्त आणि निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाला नकार दिल्यानंतर कोनगोलु यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
5 / 7
कोनगोलु यांची सोशल मीडियावर कमी माहिती आहे, ते तिथे खूप कमी सक्रीय असतात. पीके आणि त्यांची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. पुढच्या वर्षीच्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांच्या कंपनी माइंडशेअर अॅनालिटिक्सची नियुक्ती केली आहे.
6 / 7
कोनगोलु हे आपले विचार, निर्णय पक्षांवर थोपवत नाहीत. ते पडद्यामागे राहणए पसंद करतात. प्रशांत किशोर यांच्यापासून वेगळे झाल्यावर २०१६ मध्ये त्यांनी तामिळनाडूचे एमके स्टॅलिन यांच्यासाठी नमाक्कू नावाची मोहीम सुरु केली होती. ती यशस्वी देखील झाली.
7 / 7
सुनील कोनगोलु यांनी फेब्रुवारी 2018 पर्यंत दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत काम केले होते. 300 लोकांच्या टीमच्या मदतीने त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमधील राज्यांच्या निवडणुकांचा प्रचाराची रूपरेषा ठरविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी डीएमकेमध्ये एन्ट्री केली होती.
टॅग्स :congressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर