'Supercop Te Mardani'... the story of Meera Borwankar's work, ips officer was pune yerwada
'सुपरकॉप ते मर्दानी'... मीरा बोरवणकरांच्या कार्यकर्तृत्वाची अशी 'ही' कहानी By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 10:52 AM1 / 10माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिश्नर हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाल्याने राज्याच्या राजकारणात चांगलाच भूकंप झाला आहे. 2 / 10 मीरा बोरवणकर यांनी आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात पुण्यातील येरवाडा जेलमधील जागेसंबंधी गौप्यस्फोट केला. त्यामध्ये, नाव न घेता त्यांनी तत्कालीन पालकमंत्री म्हणजे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले. 3 / 10मीरा बोरवणकर यांच्या या आरोपामुळे अजित पवार आणि बोरवणकर सध्या चर्चेत आहेत. तर, महिला पोलीस अधिकाऱ्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून टीका होत आहे. मात्र, मीरा बोरवणकर यांची प्रतिमा पोलीस खात्यात नावलौकिकाची होती.4 / 10विशेष म्हणजे राणी मुखर्जी यांचा मर्दानी हा चित्रपट मीरा बोरवणकर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येतं. कारण, अंडरवर्ल्डमध्येही बोरवणकर यांचा दबदबा होता. 5 / 10देशातील सुपरकॉप म्हणूनही त्यांचा गौरव आहे. मूळत: पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मीरा बोरवणकर यांना लेडी सिंघमही म्हटलं जातं. त्या १९८१ च्या आयपीएस अधिकारी होत्या. सध्या निवृत्त आहेत. 6 / 10मीरा यांचे आई-वडिल बॉर्डर सेक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत होते. माजी आयपीएस किरण बेदी यांच्या प्रेरणेतून त्यांनी भारतीय पोलीस सेवेचे स्वप्न पाहिलं अन् त्यात उत्तीर्णही झाल्या. 7 / 10आयपीएसचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पोस्टींग मिळाली होती. मुंबईत माफिया राज संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. 8 / 10दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन गँगच्या सदस्यांना तुरुंगात पाठवण्याचं काम त्यांनी केलं. अजमल कसाब आणि १९९३ च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यातील दोषींना त्यांच्याच देखेखीखाली फाशी देण्यात आली. 9 / 10सन १९९४ मध्ये जळगांवमध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश त्यांनीच केला होता. या स्कॅममुळे त्यांचं नाव जगभरातून समोर आलं. 10 / 10राणी मुखर्जीचा मर्दानी हा चित्रपट त्यांच्याच जीवनावरील प्रेरणादायी स्टोरी आहे. त्यामुळे, राणी मुखर्जींनी अनेकदा त्यांची भेट घेऊन त्यांची माहिती घेत त्यांच्याशी अनुभव शेअर केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications