Superstar Dilip Kumar is not known by JRD Tata, dilipkumar biography
सुपरस्टार दिलीप कुमार यांना जेआरडी टाटांनी ओळखलच नाही, मग... By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 9:51 AM1 / 12बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल. 2 / 12दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील हे किस्से ऐकल्यानंतर अनेकांना वाटेल की, अभिनेता दिलीप कुमार आपल्यातीलच आहेत, तुम्हाला सहजच त्यांच्यात आपलेपणा दिसेल. 3 / 12 दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात जेआरडी टाटांसदर्भातील असाच एक किस्सा सांगण्यात आलाय. जेआरडी टाटा आणि दिलीप कुमार यांच्या पहिल्या भेटीचा तो किस्सा आहे. 4 / 12मी अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये उच्च स्थानावर होतो, तेव्हा एअर इंडियाच्या विमानातून मी प्रवास करत होतो. माझ्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. 5 / 12साधारण पँट आणि शर्ट परिधान केलेल्या या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर ते सर्वसामान्य मध्यम कुटुंबातील, पण उच्चशिक्षित असतील, असेच वाटायचे. 6 / 12विमानातील इतर प्रवाशांनी मला ओळखलं होतं, मात्र, या व्यक्तीने मला नीट पाहिलंच नसल्याने ओळखलंही नाही. ते, पेपर वाचत आणि खिडकीतून बाहेर पहात. 7 / 12एअर होस्टेसने चहा आणल्यानंतर अतिशय शांत अन् शिस्तबद्धतेनं त्यांनी चहा पिला. त्यावेळी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी त्यांच्याकडे पाहून स्मीतहास्य केलं, त्यांनीही ते केलं. 8 / 12आम्हा दोघांमध्ये चर्चा सुरू झाली, त्यावेळी चित्रपटाचा विषय निघाल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला. आपण, चित्रपट पाहता का? त्यावर जेआरटी टाटांनी उत्तर दिले, हो. पण थोड्या प्रमाणात. 9 / 12त्यानंतर, मी चित्रपटात काम करतो, असे त्यांना सांगितले. त्यांनीह व्वा छान म्हणत कौतुक केलं आणि आपण काय करता विचारले. त्यावर, दिलीप कुमार यांनी मी अभिनेता असल्याचं सांगितलं. 10 / 12दिलीप कुमार आणि जेआरटी टाटा यांच्यातील संवाद झाल्यानंतर ते फ्लाईटमधून उतरताना त्यांनी हस्तांदोलन केले. त्यावेळी, मी दिलीप कुमार असं अभिनेत्यानं नाव सांगितलं. 11 / 12दिलीप कुमार यांच्याशी हस्तांदोलन करताना, मी जेआरडी टाटा, असं नाव त्या ग्रहस्थाने सांगताच दिलीप कुमार अवाक झाले. जेआरटी यांनी मोठी शिकवण मला त्या प्रवासात दिल्याचं कुमार यांनी लिहिलंय. 12 / 12तुम्ही किती मोठे आहात याने काहीच फरक पडत नाही. कारण नेहमीच आपल्यापेक्षात मोठा कुणीतरी असतोच, म्हणून नेहमीच विनम्र राहावा... असे दिलीप कुमार यांनी पुस्तकात लिहिलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications