supertech twin tower to be demolished
भारतातील ३२ मजली इमारत १२ सेकंदात जमीनदोस्त होणार?, विमान वाहतूकही रोखणार! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 8:28 AM1 / 5नोएडातील सेक्टर ९३ मधील वादग्रस्त ठरलेली ३२ मजली सुपरटेक ट्विन टॉवर इमारत येत्या २८ ऑगस्टला केवळ १२ सेकंदात जमीनदोस्त होणार आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेली ही इमारत आता अखेर भूईसपाट होणार आहे. जमीनदोस्त होणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे.2 / 5५००० लोक जे या इमारतीच्या आसपास राहतात, त्यांना काही काळासाठी जावे लागणार सुरक्षित ठिकाणी.3 / 5या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. परंतु या मंजुरीला आक्षेप घेण्यात आला. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ही इमारत भूईसपाट होणार हे निश्चित झाले. 4 / 5ही इमारत मुंबईतील ईडीफीस इंजीनिअरिंग व दक्षिण आफ्रिकेतील जेट डेमोलेशन कंपनी भूईसपाट करणार आहे. ३५०० किलोग्रैम विस्फोटकांचा उपयोग करणार. ३५ हजार घनमीटर मलबा ही इमारत पाडल्यानंतर जवळपास जमा होईल5 / 5रविवारला दुपारी अडीच वाजता पाडली जाणार. तेव्हा धुळीने वातावरण व्यापले जाणार असल्याने या काळात दिल्ली विमानतळावरून विमानांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. जवळपास अर्धा तास दिल्लीच्या आकाशात विमान राहणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications