Surely visit this luxurious hotel in India once!
भारतातल्या या आलिशान हॉटेलला आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट द्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:56 PM1 / 5भारतात एकाहून एक सरस हॉटेल आहेत. परंतु त्यात काही अशीसुद्धा हॉटेल्स आहेत की त्यांचं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. 2 / 5हैदराबादेतील फलकनुमा पॅलेस हे देशातील आलिशान हॉटेलांपैकी एक आहे. फलकनुमा पॅलेसमध्ये सर्वात स्वस्त रूमसाठी तुम्हाला एका दिवसाला 33 हजार रुपये मोजावे लागतात. तर रॉयल सूटचं भाडं 1 लाख 95 हजारांच्या घरात आहे. 3 / 5उदयपूरचं ताज लेकसुद्धा पर्यटकांमध्ये फारचं लोकप्रिय आहे. या हॉटेलचं सौंदर्य पाहून तुम्हाला एकदा तरी त्याला भेट द्यावी अशी इच्छा नक्कीच होईल. 4 / 5जयपूरमध्ये ओबेराय ग्रुपच्या मालकीचं असलेला द ओबेराय ताजविलास हे हॉटेलसुद्धा फार सुंदर आहे. यातील सर्वात महागड्या रूमचं भाडं 2,30000 इतकं आहे. 5 / 5आग्र्यातील हॉटेल ओबेरॉय अमरविलास भारतातील महागड्या हॉटेलांपैकी एक आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र लक्झरी रूममध्ये राहण्यासाठी दीड लाख भाडं मोजावं लागतं. आणखी वाचा Subscribe to Notifications