surgical strikes printed on Sarees
मोदी-राहुल गांधींनंतर आता बाजारात आल्या सर्जिकल स्ट्राइकची प्रिंट असलेल्या साड्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:19 PM1 / 6विविधरंगी, वेगवेगळ्या डिझाइन्स असलेल्या साड्या तुम्ही बाजारात पाहिल्या असतीलच. हल्ली तर नेत्यांची छायाचित्रे असलेल्या साड्याही बघण्यात आल्या असतील. आता तर चक्क सर्जिकल स्ट्राइकचे चित्रण केलेली साडी बाजारात आली आहे. 2 / 6उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ज्याप्रकारे सीमारेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केली होती, त्याचे चित्रण या साड्यांवर केले आहे. 3 / 6भारतीय लष्कराच्या पराक्रमाला अभिवादन करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच उरी आणि पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 4 / 6यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या साड्या बाजारात आल्या होता. त्याची चर्चाही खूप झाली होती. 5 / 6मोदींनंतर राहुल गांधीची प्रतिमा प्रिंट असलेल्या साड्याही बाजारात आल्या होत्या. 6 / 6प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशानंतर त्यांची प्रतिमा प्रिंट असलेल्या साड्याही बाजारात आल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications