शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्व्हे: योगी, अमित शाह की...; कोण ठरू शकतो PM मोदींचा खरा उत्तराधिकारी? या दोन नेत्यांमध्ये 'क्लोज फाइट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 5:53 PM

1 / 9
लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरत आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द नरेंद्र मोदी यांनीही आपल्या तिसऱ्या कार्यकाळासंदर्भात अनेक वेळा दावा केला आहे.
2 / 9
नुकतेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राज्यसभेतही आपल्या तिसऱ्या कार्यकाळासंदर्भात भाष्य केले आहे. आपल्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. काही लोक याला 'मोदी 3.0' देखील म्हणत आहेत, असे मोदी यांनी म्हटले होते.
3 / 9
2014 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा भाजपला झाला होता. आजच्या राजकारणात त्यांच्या तोडीचा नेता नाही, असे मानले जाते.
4 / 9
आता एका सर्व्हेमध्ये, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या जागी, भाजपचा कोणता नेता त्यांची धुरा सांभाळण्यासाठी सर्वात सक्षम आहे? हे सांगण्यात आले आहे.
5 / 9
पीएम मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कोणता नेता सर्वाधिक योग्य? - इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, यात सहभागी झालेल्या सर्वाधिक 29 टक्के लोकांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पीएम मोदीचे उत्तराधिकारी बनण्यासाठी सर्वात सक्षम असल्याचे म्हटले आहे.
6 / 9
याच प्रमाणे 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव सुचवले आहे. तर 16 टक्के लोकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे नाव सुचवले आहे.
7 / 9
हा सर्व्हेमध्ये सर्वच्या सर्व लोकसभा मतदार संघांमधून 35,801 लोकांनी भाग घेतला होता. तसेच, 15 डिसेंबर, 2023 ते 28 जानेवारी, 2024 दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे.
8 / 9
एप्रिल अथवा मे मध्ये होऊ शकतात लोकसभा निवडणुका - महत्वाचे म्हणजे, 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून पर्यंत आहे. यामुळे एप्रिल अथवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होऊ शकतात. यासंदर्भात निवडणूक आयोग लवकरच घोषणा करेल. यातच, भाजप विजयाच्या हॅट्रिकचा दावा करत असून, चार शे प्लस जागांचे लक्ष निर्धारित करून मैदानात उतरला आहे.
9 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी...
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथNitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा