रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?; लोकसभेत खळबळजनक दावा By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 8:52 AM
1 / 10 दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण लोकसभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले. त्यामुळे पुन्हा सुशांत राजपूत प्रकरण चर्चेत आले आहे. 2 / 10 लोकसभेत निघालेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हा आरोप लावला आहे. शेवाळे यांनी या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव घेतले. 3 / 10 राहुल शेवाळे म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावानं ४४ फोन आले होते. बिहार पोलिसांच्या मते, AU चा अर्थ आदित्य आणि उद्धव असं आहे. लोकसभेत राहुल शेवाळेंच्या या विधानानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 4 / 10 या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा आमनेसामने येऊ शकतो. राहुल शेवाळेंनी असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI चा तपास कुठपर्यंत पोहचला? सीबीआयनं अंतिम निष्कर्ष काढलाय का? सुशांत सिंहच्या शरीरावर खूणा कसल्या होत्या? 5 / 10 सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांच्यातील फोन संवादात काय आढळलं? या सर्व प्रश्नावर अद्याप कुठलाही खुलासा झाला नाही. १० जून २०२० सुशांत घराबाहेर आला होता का? त्याचा लॅपटॉप, अन्य वस्तू कुणी हटवल्या? असे प्रश्न राहुल शेवाळेंनी विचारले. 6 / 10 रिया चक्रवर्ती महाराष्ट्रातील कोणत्या बड्या नेत्याच्या संपर्कात होती हे खरे आहे का? या प्रकरणी AU नाव समोर आले. रियाला ४४ कॉल AU नं केले होते. बिहार पोलिसांच्या तपासात आदित्य आणि उद्धव ठाकरे नाव समोर आले. त्यासाठी या प्रकरणाची अत्यंत बारकाईने तपासणी व्हायला हवी असं शेवाळेंनी म्हटलं. 7 / 10 लोकसभेत राहुल शेवाळे यांनी उचललेल्या या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाल्याचं दिसून आले. ठाकरे कुटुंबियांवर लावलेल्या आरोपाबद्दल अध्यक्षांनी हे कामकाजातून वगळण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदारांनी केली. 8 / 10 ठाकरे गटाची मागणी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर लावलेले आरोप कामकाजातून वगळण्यात आले. मात्र सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणावरून शिंदे गट आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. 9 / 10 दरम्यान, या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटातील खासदाराने लोकसभेत दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे आरोपी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सभागृहात आम्ही त्यांचा कडाडून विरोध केला आहे. 10 / 10 २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात होते. परंतु त्यानंतर त्याची मॅनेजर दिशा सालियन हिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यात राज्यातील तत्कालीन मंत्र्यांवर भाजपाने आरोप लावले होते. आणखी वाचा