कोण आहेत 'या' महिला IAS? ज्यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते केले सन्मानित! By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:47 AM
1 / 6 देशात असे अनेक होतकरू आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांच्या उत्कृष्ट कामांची चर्चा तर होतेच, पण त्यांच्या चांगल्या कामांसाठी सरकार त्यांचा गौरवही करते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला आयएएस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांना नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. 2 / 6 आम्ही बोलत आहोत ओडिसा केडरच्या आयएएस अधिकारी स्वधा देव सिंह यांच्याबद्दल. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने गेल्या मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते स्वधा देव सिंह यांना भूमी सन्मान २०२३ प्रदान करण्यात आला. 3 / 6 डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत भूमी अभिखांच्या डिजिटायझेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्वधा देव सिंह यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 4 / 6 दरम्यान, स्वधा देव सिंह उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बनारसमधूनच झाले. त्यानंतर त्या पदवीसाठी दिल्लीत आल्या आणि दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. 5 / 6 स्वधा देव सिंह या अभ्यासात हुशार होत्या, त्यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २०१४ मध्ये त्यांनी ही परीक्षा पास केली होती. तेव्हा त्यांचा संपूर्ण भारतात ६६वा नंबर आला होता. 6 / 6 स्वधा देव सिंह सध्या ओडिसाच्या रायगड जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत, त्यांचे पती देखील आयएएस अधिकारी आहेत. याच वर्षी त्यांनी पुरीचे कलेक्टर आयएएस समर्थ वर्मा यांच्याशी लग्न केले. हे त्यांचे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्यांचे लग्न बोलंगीरचे कलेक्टर चंचल राणा यांच्याशी झाले होते. मात्र नंतर ते दोघे वेगळे झाले. आणखी वाचा