शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Swarm Drones: स्वार्म ड्रोन्स, भारतीय लष्कराला मिळणार ब्रह्मास्त्र, एका झटक्यात उडवणार शत्रूच्या छावणीच्या ठिकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 4:00 PM

1 / 8
भारतीय लष्करासाठी २८ हजार कोटी रुपयांची यंत्र आणि हत्यारे खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या सर्वांमध्ये खास आहेत. ते स्वार्म ड्रोन्स, क्लोज क्वार्टर बॅटल कार्नाइन्स आणि बुलेट प्रुफ जॅकेट. आज आपण माहिती घेऊयात स्वार्म ड्रोन्सविषयी आणि ते एवढे खास का असतात त्याबाबत.
2 / 8
स्वार्म ड्रोन्स याचा अर्थ साध्यासोप्या भाषेत सांगायचा तर घोळक्याने एकत्र लयबद्ध पद्धतीने उडणारे ड्रोन्स. एकाच वेळी शेडको छोट्या छोट्या ड्रोन्सना हत्यारे किंवा कॅमेरे लावून शत्रूच्या भागात उतवून हेरगिरी करता येते. तसेच हत्यारांनी सज्ज करून ते शत्रूच्या तळावर सोडले जाऊ शकतात.
3 / 8
स्वार्म ड्रोन्सना रिमोट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत उडवता येते. किंवा तुम्ही एका कॉम्प्युटरच्या माध्यमातून शेकडो ड्रोन्सना कंट्रोल करू शकता. या ड्रोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील कुठलेही रडार सिस्टिम आणि अँटी एअर सिस्टिमना गुंगारा देऊ शकतात. हे ड्रोन्स पक्षांच्या झुंडीप्रमाणे येत असतील तर काही काळ शत्रूलाही काही कळणार नाही.
4 / 8
स्वार्म ड्रोन्सवर गाइडेड, अनगाइडेड, क्लस्टर, लेझर गाईडेड, HEAT बॉम्ब, छोटी क्षेपणास्त्रे आदी लावून हल्ला करता येऊ शकतो. तसेच या ड्रोन्सवर छोट्या अण्वस्रालाही वाहून नेता येते. त्याशिवाय निश्चित लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी त्यावर बंदुकाही लादता येऊ शकते.
5 / 8
स्वार्म ड्रोन्सची रेंज लष्कर आपल्या सोईनुसार निश्चित करू शकते. सध्या सर्वात लांब पल्ल्याच्या ड्रोनची मारक क्षमता ही ५० किमी एवढी आहे. शत्रूच्या परिसरात घुसताच ५०० मीटरच्या अंतरावरूनही ते लक्ष्याचा भेद करू शकतात. स्वार्म ड्रोन्सना दूरवरून कंट्रोल युनिटच्या माध्यमातून नियंत्रित करता येऊ शकते.
6 / 8
भारतीय लष्कर स्वार्म ड्रोन्सचा वापर अनेक प्रकारे करणार आहे. यामध्ये केवळ हल्लाच नाही तर एअर ड्रॉपिंग, रसद पुरवठा, दारुगोळा आणि सैनिकांसाठी अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी स्वार्म ड्रोन्सचा वापर होऊ शकतो.
7 / 8
तसेच स्वार्म ड्रोन्सचा उपयोग सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, निश्चित टार्गेटवर हल्ले, हेरगिरी यासाठी होऊ शकतो. तसेच बचाव मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यासाठी होऊ शकतो.
8 / 8
स्वार्म ड्रोन्स म्हणजेच शेकडो छोटी छोटी ड्रोन्स वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ला करू शकतात. या ड्रोन्सची संख्या अधिक असल्याने शत्रूच्या अँटी एअरक्राफ्ट गन्सही निष्प्रभ ठरतात.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागwarयुद्ध