शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:36 PM

1 / 10
लडाखमधील भारत अन् चीनमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चीन सातत्यानं भारताच्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे.
2 / 10
तर दुसऱ्या आघाडीवर चीन पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांनाही भारताविरोधात बळ देत आहेत. त्यामुळे भारताला चीन अन् पाकिस्तान दोन्ही बाजूंनी धोका आहे.
3 / 10
चीन आणि पाकिस्तानची आव्हाने पाहता केंद्र सरकार भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांना बळकट करण्याचे ठरवले आहे. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सरकारच्या भारत अर्थ मूवर्स लिमिटेडकडून 1512 माइन प्लाऊ उपकरणांची खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
4 / 10
557 कोटी रुपये खर्चून ही उपकरणं विकत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे माइन प्लाऊ उपकरणं टी-90 टँकवर बसविण्यात येणार आहेत. याद्वारे रणगाड्यावरच बसून शत्रूंच्या खाणी खोदून बाहेर काढणं शक्य होणार आहे.
5 / 10
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कराराअंतर्गत 50 टक्के स्वदेशी साहित्याने खरेदी करून त्याद्वारे ती बनवली जाणार आहेत.
6 / 10
सर्व माइन प्लाऊ 2027 पर्यंत उपलब्ध होतील आणि ते एक किंवा दोन वर्षांत सुरू कार्यान्वित केले जाऊ शकतात.
7 / 10
सीमेवरील चकमकीच्या वेळी शत्रू सैन्याने जमिनीत खाणी खोदून छुप्या पद्धतीनं हल्ला केल्यास अशा परिस्थितीत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही माइन प्लाऊ उपकरणं भारतासाठी उपयोगी पडणार आहे.
8 / 10
माइन प्लाऊ हे एक साधन आहे, ज्यातून जमीन खणली जाऊ शकते आणि काळजीपूर्वक खाणी काढल्या जाऊ शकतात.
9 / 10
अशा परिस्थितीत जर युद्धाच्या वेळी जर जमिनीखालून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास हे माइन प्लाऊ उपकरणं बसवलेले रणगाडे निर्णायक भूमिका बजावणार आहेत.
10 / 10
रणगाड्यावरील ही माइन प्लाऊ सहजतेने जमिनीखाली शत्रूचे लपलेले सैनिक ठिकाणाला लक्ष्य करणारआहेत, त्यात आपल्या जवानांचं कोणतंही नुकसान होणार नाही.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन