taj mahal controversy know about professor p n oak who wrote book on tejo mahalaya
Taj Mahal Controversy: ‘असा’ सुरु झाला ताजमहाल वाद! ‘तेजो महालय’चा दावा करणारे मराठमोळे इतिहासकार पीएन ओक कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 1:45 PM1 / 15जगभरातील सात आश्चर्यांपैकी एक भारतातील सर्वांत मनमोहक वास्तू म्हणजे ताजमहाल. ताजमहाल जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. ताजमहालाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. ताजमहालबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून, तेथे पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा केला जातो. (Taj Mahal Controversy)2 / 15ताजमहालात अशा २२ खोल्या आहेत, ज्यात मोठी रहस्ये दडलेली असल्याचे सांगितले जाते. या २२ खोल्या उघडण्यासंदर्भात एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ताजमहालचा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. (Taj Mahal 22 Rooms Mystery)3 / 15मात्र, ताजमहालबाबतचा हा वाद नवा नाही. ताजमहालापूर्वी येथे शिवमंदिर होते, असा दावा हिंदू संघटना करत आहेत. जे 'तेजो महालय' म्हणून ओळखले जात होते. ताजमहालचे 'तेजो महालय' हे नाव प्रथम मराठी पुस्तकातून आले.4 / 15या पुस्तकारचे लेखक मराठमोळे इतिहासकार पीएनओके आहेत. पीएन ओक यांनी १९६० ते ७० च्या दशकात ताजमहाल, फतेहपूर सिक्री आणि लाल किल्ल्याबद्दल अनेक पुस्तके लिहिली. मात्र, या पुस्तकांवरून अनेक वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. 5 / 15पीएन ओक यांनी आपल्या 'ताजमहाल : द ट्रू स्टोरी' या पुस्तकात ताजमहालाऐवजी शिवमंदिर असावे, असे म्हटले होते. ओक यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की, हे स्मारक ११५५ मध्ये बांधले गेले होते. म्हणजेच मुघल राजवटीच्या दशकांपूर्वीपासूनच ही इमारत अस्तित्वात होती. 6 / 15पीएन ओक आपल्या पुस्तकात म्हणतात की, ताजमहालचे नाव पूर्वी शिवमंदिराच्या नावावरून 'तेजो महालय' असे ठेवण्यात आले होते. ताजमहाल व्यतिरिक्त ओक यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये काबावरही प्रश्न उपस्थित केले होते. एवढेच नाही तर ओक यांनी ख्रिश्चन धर्माला कृष्णा नीति आणि व्हॅटिकन सिटीला वाटिका असे संबोधले होते. यावरूनही अनेक वाद झाल्याचे म्हटले जाते. 7 / 15पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पीएन ओक हे पत्रकार आणि इतिहास लेखक होते. त्यांनी 'ताजमहाल एक शिव मंदिर', 'फतेहपूर सिक्री एक हिंदू नगर' इत्यादी पुस्तके लिहिली. इंदूरमध्ये जन्मलेल्या ओक यांच्याकडे एम.ए.ची पदवी होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्येही ते दीर्घकाळ प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात ते सैन्यातही दाखल झाले होते.8 / 15दुसरीकडे, इतिहासकार राजकिशोर यांच्या मते, ताजमहालातील त्या २२ खोल्या उघडल्या तर कळेल मंदिर होते की नाही? त्या २२ खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मंदिराच्या खुणा आढळल्या तर कळेल की, कधी काळी हे मंदिर होते, मकबरा नव्हता. 9 / 15यापूर्वी ताजमहालच्या खाली बांधलेल्या २२ खोल्यांपर्यंत जाण्यासाठी मार्ग होता, मात्र ४५ वर्षांपूर्वी एएसआयने तो मार्ग बंद केला. त्या २२ खोल्यांमध्ये काय आहे? हे रहस्य अजून उलगडलेले नाही. राजकिशोर म्हणाले की, ताजमहालच्या या २२ खोल्या उघडल्यानंतर ताजमहालशी संबंधित सर्व रहस्ये बाहेर येतील.10 / 15ज्यावेळी ताजमहाल बांधला गेला त्यावेळी शाहजहान दक्षिण भारतात होता. त्याच्यासोबत मुमताजही होती. मुमताजचा बुरहानपूर येथे मृत्यू झाला. शाहजहानचा मुलगा सौजा मुमताजचा मृतदेह घेऊन आग्रा येथे आला. 11 / 15इतिहासकार राजकिशोर यांनी प्रश्न उपस्थित केला की, एवढी मोठी इमारत बांधली जात असताना शहाजहान ताजमहालमध्ये का नव्हता? ताजमहालची इमारत पूर्वी बांधली गेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता राजकिशोर यांनी व्यक्त केली आहे. 12 / 15ताजमहाल ज्या ठिकाणी आहे ती जयपूरचे राजा मानसिंग यांची मालमत्ता होती. शहाजहानने ताजमहालच्या बदल्यात मानसिंगचा नातू राजा जयसिंह याला चार इमारती दिल्या होत्या.13 / 15दरम्यान, ताजमहालात हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा भाजप प्रवक्त्याने आपल्या याचिकेत केला आहे. अयोध्येतील भाजप प्रवक्त्याने ही याचिका दाखल केली आहे. ASI ला ताजमहालमधील या २२ खोल्या बंद करण्याचे कारण काय आहे? असे विचारले असल्याचा दावा भाजप प्रवक्याने केला आहे. 14 / 15कोणाच्या आदेशाने ताजमहालातील खोल्या बंद करण्यात आल्या आहेत? यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच ही याचिका दाखल केल्याची माहिती भाजप प्रवक्याने दिली. 15 / 15ताजमहाल छोटी जागा नाही. या २२ खोल्या का बंद आहेत? याचे उत्तर मिळाले पाहिजे. या खोल्यांमुळे ताजमहालाबाबत अनेकदा वाद निर्माण होत असल्याचेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications