शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तालिबानी भारतात घुसण्याच्या तयारीत? भारत-बांगलादेश बॉर्डरवर BSF जवान अलर्ट, गुप्त माहिती हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 2:45 PM

1 / 11
अफगाणिस्तान(Afghanistan) वर तालिबाननं(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर भारतासाठी चिंता वाढली आहे. त्यातच आता पश्चिम बंगाल(West Bengal)सह बांगलादेशी सीमेतून तालिबानी घुसखोरीच्या तयारीत असल्याने भारताला धोका वाढला आहे.
2 / 11
भारत-बांगलादेश(India-Bangladesh Border) वर सीमा सुरक्षा दलाने सतर्कता वाढवली आहे. काही कट्टरपंथी बांगलादेशी युवक अफगाणिस्तानातील तालिबानींमध्ये सहभागी होऊन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 / 11
तालिबानींच्या या हालचालींमुळे बीएसएफचे जवान भारत-बांगलादेश सीमेवर अलर्टवर आले आहेत. ढाका पोलीस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी सांगितले की, काही युवक कुठल्याही प्रकारे अफगाणिस्तानात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.
4 / 11
या युवकांची किती संख्या आहे हे स्पष्ट नाही. कारण याची सूचना अद्याप मिळाली नाही. ढाका पोलीस आयुक्तांच्या या विधानानंतर बीएसएफ(BSF) दक्षिण बंगाल फ्रंटियरचे डीआयजी एस एस गुलेरिया यांनी आमचे सैनिक अलर्टवर आहेत. आतापर्यंत आम्ही तालिबानींमध्ये सहभागी होऊन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या युवकांना अटक केली नाही असं सांगितले.
5 / 11
सीमेवर बीएसएफ जवान अलर्ट एस एस गुलेरिया यांनी सांगितले की, बांगलादेशी अधिकाऱ्यांनी भारतातील अधिकाऱ्यांना यापूर्वी सुचित केले आहे की, काही कट्टरपंथी तालिबानद्वारे अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर खूप उत्साही झाले आहेत.
6 / 11
तसेच तालिबानींनी कथितपणे बांगलादेशी युवकांना तालिबानमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. बांगलादेशी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ते अफगाणिस्तानातील हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. बांगलादेशाने याविषयी सतर्क केल्यानंतर बीएसएसने सीमाभागात तैनात असणाऱ्या सैनिकांना अलर्टवर ठेवलं आहे.
7 / 11
BSF च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेशी कट्टरपंथींना वाटतं की, तालिबानने अमेरिकन सैन्याला हरवून अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. या संघटनांना मागील काही वर्षापासून बांगलादेशी अधिकाऱ्यांनी हतबल केले होते.
8 / 11
सूत्रांच्या माहितीनुसार, काही बांगलादेशी कट्टरपंथी भारताच्या मार्गे अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण भारता व्हिसा मिळवणं शक्य असल्याचं त्यांना वाटतं. २० वर्षापूर्वी अनेक बांगलादेशी युवक तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानात गेले होते. सुरक्षेच्या कारणास्तव सीमा सुरक्षा दलाने सुरक्षा वाढवली आहे.
9 / 11
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
10 / 11
तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे. परंतु तालिबानींविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. वेळीच तालिबानी कृत्यांना आवर घालायला हवा असं मौलाना कल्बे यांनी सांगितले.
11 / 11
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान, खासदार पुत्र आणि AIMPLB प्रवक्ते सज्जाद नोमानी तालिबानच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य करत आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु मौलाना कल्बे जव्वाद यांनी तालिबानी माणसाच्या रुपात जनावरं आहे अशी घणाघाती टीका केली आहे.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानBangladeshबांगलादेशIndiaभारत