This is the tallest post office in the world, you can also send postcards from here!
हे आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस, तुम्हीही पाठवू शकता इथून पोस्टकार्ड! By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:17 PM1 / 5स्मार्टफोनच्या काळात पत्र कोण पाठवतं? हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. सध्या तरी पोस्टातून पत्र पाठवणं हे फारच दुर्मीळ झालं आहे. पण आपल्याला माहीत आहे का, जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आपल्याच देशात आहे. 2 / 5हिक्कीमच्या जवळपासच्या गावांमध्ये संपर्क साधण्याचं एकमेव साधन आहे. या पोस्ट ऑफिसवर हिक्कीमशिवाय लांगचा-1, लांगचा-2 आणि कॉमिक गावांमध्ये पत्र पाठवण्याचं साधन आहे. 3 / 5स्पितीचा रस्ता काही महिन्यांसाठीच खुला असतो. बर्फ विरगळ्यानंतर जूनपासून ऑक्टोबरपर्यंत इथे येणं शक्य आहे. इतर महिन्यांमध्ये इथले रस्ते बर्फाच्छादित असतात. या पोस्ट ऑफिसमध्ये 1983पासून रिनचेन नावाची व्यक्ती पोस्टमनची भूमिका निभावत होती. 4 / 52016ला त्यांच्याशी झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी पत्र पोहोचवण्यासंदर्भातही सांगितलं होतं. बर्फवृष्टीमध्येच पत्र पोहोचवण्याकरिता बाहेर पडलेल्या रिनचेनला घरी परतणंही काहीसं कठीण झालं आहे. परत येण्यासाठी त्यांनी एक पूर्ण दिवस लागायचा. खरंतर आपणही या जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून चिठ्ठी पाठवू शकतो. 5 / 5स्पीतीपासून जवळपास असलेल्या काजाजवळ तासाभरावरच हिक्कीम आहे. त्यामुळे पोस्ट कार्ड काजावरून खरेदी करणं सोयीस्कर ठरतं. हिक्कीम गाव हे फक्त पोस्ट ऑफिससाठीच नव्हे, तर इथे आढळणाऱ्या फोसिल्स म्हणजेच जीवाश्मांसाठीही प्रसिद्ध आहेत. इथे बऱ्याचदा दगडांवर जीवाश्म सापडले असून, हे जीवाश्म ज्यांना सापडतात ते भाग्यवान असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications