शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तामिळनाडूत भाजपानं खेळला UP चा राजकीय डाव; २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेमचेंजर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 2:34 PM

1 / 10
'अबकी बार ४०० पार' नारा देत भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यंदाच्या निवडणुकीत ४०० जागांचं टार्गेट ठेवत भाजपानं विशेषत: पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतावर फोकस ठेवला आहे. त्यात तामिळनाडूवर खास नजर आहे.
2 / 10
तामिळनाडूत कमळ फुलवण्यासाठी भाजपा जीवापाड मेहनत घेत आहे. आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपानं तामिळनाडूत आता नवा फॉर्म्युला तयार केला आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, राज्यातील छोट्या छोट्या पक्षांना एनडीएमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
3 / 10
या नव्या मित्रपक्षांच्या साथीनं भाजपा सामाजिक समीकरण जुळवण्याची रणनीती आखतेय. यंदा तामिळनाडूत ९ पक्षांचा एनडीएत समावेश करण्यात आला आहे. भाजपानं राज्यात या मित्रपक्षांच्या मदतीनं तामिळनाडूत यश मिळवण्याचा डाव खेळत आहे.
4 / 10
भाजपासाठी ही रणनीती सहज सोपी नाही. कारण द्रविड मुन्नेम कड्गम(DMK) आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड् मुन्नेम कड्गम(AIDMK) या पक्षाचं वर्चस्व दिर्घ काळापासून आहे. दोन्ही पक्ष गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत आहेत. परंतु याठिकाणी छोट्या छोट्या पक्षांनाही फार महत्त्व आहे.
5 / 10
तामिळनाडूची लोकसंख्या जवळपास ७.२ कोटी इतकी आहे. याठिकाणी वेगवेगळ्या जातीसमुह राजकारणाची दिशा आणि दशा निश्चित करतात. २०१९ मध्ये तामिळनाडू भाजपी आणि एआयडिएमकेनं एकत्रित निवडणूक लढवली. त्यावेळी ७ अन्य पक्ष एनडीएचा भाग होते.
6 / 10
मात्र तरीही डीएमकेच्या शानदार प्रदर्शनामुळे राज्यात एनडीएचा पराभव झाला. आता एआयडिएमके आणि भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएमध्ये सहभागी ९ छोट्या पक्षांच्या मदतीनं भाजपा राज्यात जातीय समीकरण भेदण्याचा प्रयत्न करतेय.
7 / 10
पक्षाचे रणनीतीकार पट्टाली मक्कल काची हे मजबूत सहकारी मानले जातायेत. भाजपा याठिकाणी १९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर २ जागा शशिकला यांचा भाचा टीटीवी दिनकरन यांचा पक्ष अम्मा मक्कल मुन्नेम कडंगम यांना दिल्या आहेत.
8 / 10
दक्षिणेचं द्वार समजल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्यात भाजपानं अनेकदा सरकार बनवलं आहे. याठिकाणी लोकसभा निवडणुकीतही चांगलं यश मिळवते. कर्नाटकात २८ पैकी २५ जागांवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाली होती. २०१४ मध्ये १७ जागा भाजपानं जिंकल्या होत्या.
9 / 10
परंतु कर्नाटकाशेजारील तामिळनाडूत भाजपाला आतापर्यंत फारसं यश मिळालं नाही. हे चित्र आता भाजपाला बदलायचं आहे. त्याठिकाणी एकीकडे पंतप्रधान मोदी वारंवार दौरे करत आहे तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजपा आक्रमकपणे पुढे वाटचाल करतंय.
10 / 10
मागील १०० दिवसांत ७ वेळा मोदी तामिळनाडूमध्ये गेलेत. तामिळनाडूत यंदा ६ जागा तरी भाजपा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जर यंदा भाजपाला तामिळनाडूमध्ये जागा जिंकण्यात यश आलं तर ती सर्वात मोठी गोष्ट असेल. कारण आजपर्यंत इथं पक्षाने खाते खोलले नाही.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Tamil Nadu Lok Sabha Election 2024तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी