tamilnadu man blames google maps for marital discord SSS
काय सांगता? Google maps मुळे पती-पत्नीत झालं कडाक्याचं भांडण; घेतली थेट पोलिसात धाव By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:16 PM1 / 10गुगल मॅप्सचा वापर हा प्रामुख्याने लोकेशन शोधण्यासाठी केला जातो. त्यामुळे हल्ली प्रत्येकाच्या फोनमध्ये गुगल मॅप्स हे हमखास असतं. 2 / 10एखाद्या नवीन ठिकाणी जाताना गुगल मॅप्स आधार घेतला जातो. पण तुम्हाल जर कोणी यावरून भांडण झाल्याचं सांगितलं तर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. 3 / 10गुगल मॅप्स हे एका दाम्पत्याच्या भांडणाचं कारण ठरलं आहे. या अॅपविरोधात चक्क एका पतीने पोलिसांत थेट तक्रार दाखल केली आहे. 4 / 10तमिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातील मायलादुथुरै येथील एका व्यक्तीचं गुगल मॅप्स वरून आपल्या पत्नीशी जोरदार भांडण झालं आहे. भांडण इतकं टोकाला गेलं आहे की लग्न मोडण्याची वेळ आली आहे. 5 / 10लाल बहादूर नगरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची पत्नी गुगल मॅप्सच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवते. अशा परिस्थितीत अॅपदेखील तो कधीच न गेलेल्या ठिकाणांची पत्नीला माहिती देतं.6 / 10आर. चंद्रशेखरन असं या व्यक्तीचं नाव असून त्याने गुगल मॅप विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली. जिथे मी कधीही गेलो नाही अशा ठिकाणी मी जाऊन आल्याचं गुगल आपल्या मॅपवर लोकेशन हिस्ट्रीमध्ये दाखवत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 7 / 10माझ्यात आणि पत्नीमध्ये यामुळे खूप वाद होत आहेत. जी ठिकाण मी कधी पाहिली नाहीत किंवा मला माहीतही नाहीत अशा ठिकाणी जाऊन आल्याचा दावा गुगल मॅप करत असं त्यांनी म्हटलं आहे.8 / 10गुगल मॅपमुळे एकंदरीच माझ्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या आहेत अशी तक्रार व्यक्तीने पोलिसांत केल्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. 9 / 10काही दिवसांपूर्वी आमच्यामध्ये भांडण झालं तेव्हा पत्नीने माझ्यावर अविश्वास दाखवून मला ट्रॅक करायला सुरुवात केली. त्यामुळे पती खोटं बोलतो असं म्हणत वाद घालण्यास सुरुवात केल्याचं पतीने म्हटलं.10 / 10गुगल मॅप्स चुकीचं लोकेशन ट्रॅक करत असल्याचं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications