शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cyrus Mistry यांच्या अपघाती निधनानंतर गडकरींचे Amazon ला आदेश, 'या' प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 3:38 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या अपघातांनी केंद्र सरकारचे विशेषकरून नितीन गडकरींचे लक्ष वेधून घेतले आहे. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. कारण ते मागच्या सीटवर बसले होते आणि सीटबेल्ट न बांधल्याने त्यांचे डोके आदळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तसे पाहता असे अपघात नेहमीच होत असतात, परंतु या दोन्ही व्यक्ती राजकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्तवाच्या असल्याने याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.
2 / 9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार कंपन्यांना कारमध्ये सहा सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. असे असले तरी आता सीटबेल्टवरून देखील गडकरींनी मोठे संकेत दिले आहेत. आता त्याचीही तयारी ऑटो कंपन्यांना करावी लागणार आहे. सरकार यासंबंधी आदेश जारी करणार आहे. यामुळे ज्या गाड्यांमध्ये सीटबेल्ट आहेत त्यांना सीटबेल्ट वापरावा लागणार आहे.
3 / 9
सध्या देशात ड्रायव्हरने सीटबेल्ट लावावा असा नियम आहे. त्याचीच पावती फाडली जाते. सुरक्षा हवी असेल किंवा जे जागरुक आहेत, ते सहप्रवाशाला देखील पॅसेंजर सीटबेल्ट वापरण्यास सांगतात. परंतु, सध्यातरी पाठीमागच्या सीटवर बसलेला व्यक्ती सीट बेल्ट वापरत नाही. या सीटवरील प्रवाशांनी सीटबेल्ट वापरले तर अनेकांचे जीव वाचतील. कारण हे सीटबेल्ट या मागच्या सीटवर बेसावध बसलेल्या व्यक्तींना सीटवरच बांधून ठेवतील आणि ते पुढे आदळणार नाहीत.
4 / 9
सध्या सीटबेल्टवरून अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्या महत्त्वावर मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरू आहेत. अशातच सरकारनं शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी एक आदेश जारी केला आहे. तसंच एका प्रोडक्टच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.
5 / 9
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सीट बेल्टच्या महत्त्व अधिक चर्चा होत आहे. याच गोष्टीला पुढे नेत आता सरकारनं ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी एक आदेश जारी केला आहे. गडकरींनी अॅमेझॉनला सीट बेल्ट अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांवण्यास सांगितलंय.
6 / 9
गडकरींनी अॅमेझॉनला आपल्या साईटवरून अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांबण्यास सांगितलं आहे. अनेक लोक अॅमेझॉनवर क्लिप्स खरेदी करतात, त्याचा वापर सीट बेल्टचा अलार्म बंद करण्यासाठी होतो, असं गडकरींनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. या प्रोडक्टची विक्री थांबवण्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
7 / 9
सध्याच्या तंत्रज्ञानानुसार पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावला नसेल तर अलार्म वाजत राहतो. आता मागच्या सीटवर देखील तशीच सोय केली जाणार आहे. हा नियम लागू झाल्यावर ज्या गाड्या रस्त्यावर येतील त्यात मागच्या सीटखाली वजनाचा सेन्सर असणार आहे. त्या सीटवर कोणी बसले आणि सीटबेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहिल. याबाबतचा आदेश जारी होईल असंही गडकरी यापूर्वी म्हणाले होते.
8 / 9
2019 मध्ये मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. त्यात मोटार वाहन कायद्याच्या कलम 194(B)(1) मध्ये तरतूद करण्यात आली होती. यानुसार जो कोणी मोटार वाहन चालवतो किंवा प्रवासी घेऊन जातो, त्याने सीट बेल्ट घालणे बंधनकार असल्याचे म्हटले होते. परंतू, त्यात स्पष्टता नव्हती. यामुळे फक्त ड्रायव्हरच सीटबेल्ट लावण्यासाठी बंधनकारक आहे असे समजले जायचे, त्यानुसार पोलीस पावत्या फाडत होते. हा दंड १००० रुपये होता.
9 / 9
कारमध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वयाचे कोणी असेल तर त्यानेही सेफ्टी बेल्ट घालणे आवश्यक आहे. एक ते पाच-सात वर्षांच्या मुलाला एक वेगळी आयसोफिक्स सीट येते, ती वापरणे बंधनकारक आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२ मध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे १५१४६ लोकांचा मृत्यू झाला. तर ३९१०२ जण जखमी झाले आहेत.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCyrus Mistryसायरस मिस्त्रीVinayak Meteविनायक मेटे