Telangana: Farmer finds 5 kg gold ornaments while levelling barran land in Jangaon
ओसाड जमीन खोदताना भांडे खणखणले; तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने पाहून डोळे विस्फारले By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 6:11 PM1 / 10तेलंगानाच्या जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थीमध्ये एका शेतकऱ्याला घबाड सापडले आहेत. (A farmer from Pembarthi in Jangaon district from Telangana discovered a pot filled with gold on Thursday.)2 / 10गुरुवारी एका ओसाड जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु असताना मातीतून सोन्याचे दागिने पडू लागल्याचा प्रकार घडला.3 / 10शेतकरी नरसिंह याला जवळपास 5 किलो सोन्याचे करोडोंमध्ये किंमत असलेले ऐतिहासिक दागिने सापडले आहेत. 4 / 10याची सोन्याच्या भावाप्रमाणे किंमत 2 कोटी आहे. परंतू अँटीक वस्तूंच्या बाजारात याची किंमत न सांगता येण्यासारखी आहे. 5 / 10नरसिंह याला सोन्याचा घडा मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा घडा पाहण्यासाठी शेकडो लोकांची जंगलात गर्दी झाली. 6 / 10याची माहिती प्रशासनाला मिळताच पोलिसांसह महसूलचे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी हे सोने ताब्यात घेऊन निरिक्षणासाठी पाठविले आहे. 7 / 10नरसिंह यांने एक महिन्यापूर्वीच ही 11 एकर जमीन खरेदी केली होती. ती जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी लेव्हलिंगचे काम सुरु होते. 8 / 10हा खजिना काकतीय साम्राज्याच्या वेळच असल्याचे सांगितले जात आहे. 9 / 10काकतीय साम्राज्याची राजधानी वारंगल होती. जनगाव आधी वारंगलचा भाग होते. काही वर्षांपूर्वीच आता वेगळा जिल्हा बनविण्यात आला आहे. 10 / 10आता हा खजिना ऐतिहासिक निघाला तर नरसिंह या शेतकऱ्याला त्याच्या एकूण किंमतीचा काही भाग बक्षीस म्हणून मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा जमीन खरेदीचा खर्च वसूल होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications