The temple built by his wife!
पत्नीच्या आठवणीत त्यानं बांधलं मंदिर! By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 2:31 PM1 / 5मुंबई : बादशाह शहाजहान याने आपल्या पत्नीच्या आठवणीत ताजमहाल बांधला. हे सर्वांनाच माहित आहेच. मात्र, आजच्या काळात आपल्या पत्नीच्या आठवणीत असे कोण करेल का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतू एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या आठवणीत मंदिर बांधले आहे.2 / 5तेलंगणामधील सिद्दिपेत जिल्ह्यातील चंद्र गौड या व्यक्तीने आपली पत्नी राजमनी हिच्या आठवणीत मंदिर बांधले आहे. पत्नी राजमनी हिचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यामुळे चंद्र गौड खूप दु:खी झाले. तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी त्याने मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. 3 / 5सिद्दिपेत जिल्ह्यातील दुब्बका मंडलमध्ये त्याने पत्नी राजमणी यांच्या आठवणीत मंदिर बांधले. याठिकाणी ते दररोज पूजा करतात. 4 / 5तसेच, मंदिरात रोज गेल्यानंतर पत्नीच्या आठवणीने भावूक होतात. 5 / 5दरम्यान, आजूबाजूच्या गावातील लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications