A tenure - 12 years after the flowering Neilakurinya!
एक तप - 12 वर्षांनी फुलतेय नीलाकुरिंजी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 8:26 PM1 / 5केरळमधील मुन्नार सध्या जांभळ्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे, कारण तेथे तब्बल 12 वर्षांनी नीलाकुरिंजी हे फुलं फुलताना दिसत आहे. 2 / 5जांभळ्या आणि गुलाबी रंगात न्हाऊन निघालेलं हे सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत आहे. तब्बल बार वर्षांनी मुन्नारच्या हिरव्यागार टेकड्यांवर नीलाकुरिंजीला बहर आला आहे. 3 / 5 केरळात आढळणारी नीलाकुरिंजी अत्यंत दुर्मिळ आहे. बारा वर्षांनी एकदाच नीलाकुरिंजीला बहार येतो. त्यानंतर ही रोपटी मरून जातात.4 / 5पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासोबतच ही फुलझाडं, फुलपाखरं आणि मधमाशांसाठीही तितकीच उपयुक्त आहेत.5 / 5आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये नीलाकुरिंजीच्या ४५० विविध प्रजाती आढळतात. त्यातल्या १४६ प्रजाती या भारतात आहेत तर तब्बल ४३ या फक्त देवभूमीत म्हणजे केरळात आढळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications