शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

The Kashmir Files: 'देशाला सत्य सांगणारे स्वत:च्या खिशात हात गेला की उघडे पडले'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 4:58 PM

1 / 10
देशातील काही राज्यांत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर, अनेक ठिकाणी चित्रपटांचे बुकींग नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. देशासमोर सत्य आलं पाहिजे, असं म्हणत भाजप नेते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी लोकांना चित्रपट पाहण्याचं आवाहनही केलंय.
2 / 10
हरयाणाच्या रेवाडी शहरातील एका हॉलमध्ये एलईडी स्क्रीनद्वारे या सिनेमाचं स्क्रीनींग करण्यात येणार होतं. आज सायंकाळी 6.30 वाजता त्यासाठी भागातील लोकांना निमंत्रणही देण्यात आलं होतं.
3 / 10
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या ओपन स्क्रिनींग चित्रपटाच्या शोला विरोध केला असून असा चित्रपट दाखवणे हे फौजदारी गुन्हा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
4 / 10
अग्निहोत्री यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल ठक्कर यांना ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, राजकीय नेत्यांनी तिकीट विकत घेऊन, शांतपणे, देशभक्ती आणि समाजसेवा करायला हवी.
5 / 10
क्रिएटीव्ह बिझनेसचा आदर सन्मान करायला हवा. कायदेशीर आणि सनदशीर मार्गानेच हा चित्रपट लोकांना दाखवयला हवा, असेही अग्निहोत्री यांनी म्हटलंय.
6 / 10
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे राई्टस रिझर्व्ह ठेवले आहेत. त्यामुळे, हा चित्रपट अशारितीने ओपन स्पेसमध्ये, हॉलमध्ये स्क्रिनींग करता येत नाही.
7 / 10
विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटनंतर काँग्रेसने त्यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रस नेते श्रीनिवास बी.व्ही. यांनी प्रशांत कुमार यांचं एक ट्विट रिट्विट केलंय.
8 / 10
या ट्विटमध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. अरे अरे... आत्तापर्यंत समाज जागविण्याची गोष्ट करत होतात. देशाला सत्य सांगण्याच्या बाता करत होतात.
9 / 10
जेव्हा गोष्ट स्वत:च्या खिशावर आणि पॉकेटवर आली तेव्हा ज्ञान पाजळायला लागलात. सगळा खेळ स्वत:चा खिशा गरम करण्याचा आहे, हे सर्वांना समजलंय. राष्ट्रवाद विकणारे हळू हळू उघडे पडत आहेत, असे या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
10 / 10
काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही. यांनी हे ट्विट रिट्विट करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.
टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सcongressकाँग्रेसcinemaसिनेमाTwitterट्विटर