The new parliament building built in 862 crores know about the architect Bimal Patel see photos
Photos: ८६२ कोटींमध्ये बनून तयार झालं नवं संसद भवन, जाणून घ्या याचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांच्याबद्दल By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 2:21 PM1 / 11नवीन संसद भवनाचं काम आता पूर्ण झालंय. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. नवीन संसद भवन विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. १० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी त्याची पायाभरणी केली होती.2 / 11काँग्रेसने संसदेच्या नवीन इमारतीवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि याला 'पर्सनल व्हॅनिटी प्रोजेक्ट' म्हटलं. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही नवीन संसद भवनाचा फोटो ट्वीट करताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'संसद भवनाचे एकमेव आर्किटेक्ट, डिझायनर आणि कार्यकर्ता २८ मे रोजी उद्घाटन करतील,’ असं ते म्हणाले होते.3 / 11नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्टनं केलंय. पण या संसद भवनाचं डिझाईन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केलंय. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबादमधील आहेत. याआधीही त्यांनी अनेक प्रसिद्ध इमारतींचं डिझाईन केलंय.4 / 11बिमल पटेल यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६१ रोजी गुजरातमध्ये झाला. ते जवळपास ३५ वर्षांपासून आर्किटेक्चर, शहरी रचना आणि शहरी नियोजनाशी संबंधित कामाशी निगडीत आहेत. याशिवाय पटेल हे अहमदाबादस्थित सीईपीटी विद्यापीठाचे अध्यक्षही आहेत. एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या आर्किटेक्चर, प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट फर्मचेही ते नेतृत्व करतात.5 / 11२०१९ मध्ये पटेल यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलंय. त्यांनी अहमदाबादमधील सेंट झेवियर्स शाळेतून सुरूवातीचं शिक्षण घेतलं. नंतर सेंटर फॉर इन्व्हायरमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉडी स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टचं शिक्षण घेतलं.6 / 11१९८४ मध्ये CEPT मधून आर्किटेक्चरमध्ये पहिली व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतलं. १९९५ मध्ये त्यांनी पीएचडी पदवी मिळवली.7 / 11१९९० मध्ये बिमल पटेल वडिलांसोबत काम करू लागले. त्यांनी सर्वप्रथम अहमदाबादमधील एटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूटची रचना केली. यासाठी त्यांना १९९२ मध्ये आर्किटेक्चरसाठी आगा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यानंतर त्यांनी घरं, संस्था, औद्योगिक इमारती आणि नागरी पुनर्विकास प्रकल्पांवर काम केलं. कांकरिया लेक डेव्हलपमेंट आणि साबरमती रिव्हरफ्रंट सारखे शहरी डिझाइन प्रकल्प हे आपल्या प्रकारचे पहिले प्रकल्प आहेत.8 / 11त्यांच्या कार्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. १९९२ मध्ये आर्किटेक्चरसाठी आगा खान पुरस्कार, १९९८ मध्ये युनायटेड नेशन्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, २००१ मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड आणि २००६ मध्ये पीएम नॅशनल अवॉर्ड इन एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाइन.9 / 11त्रिकोणाच्या आकारात बांधलेली नवीन संसद भवनाची इमारत चार मजली आहे. हा संपूर्ण परिसर ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. त्याची किंमत ८६२ कोटी रुपये आहे.10 / 11याशिवाय या संसदेमध्ये सदस्यांसाठी लाउंज, अनेक कमिटी रूम, डायनिंग एरिया आणि पार्किंगची जागा असेल. संसद भवनाचे तीन मुख्य दरवाजे असतील - ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार. व्हीआयपी, खासदार आणि अभ्यागतांची एंट्री वेगवेगळ्या गेटमधून असेल. 11 / 11नवीन संसद भवनात ८८८ लोकसभा आणि ३०० राज्यसभा खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास एकावेळी १,२८० खासदार बसू शकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications