The pile of dead bodies, the cries of relatives, the horrifying scene at the accident site in Haras
Hathras Stamped: मृतदेहांचा खच, नातेवाईकांचा आक्रोष, हारसमधील दुर्घटनास्थळावर भयावह दृश्य By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 8:56 PM1 / 7उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील रतिभानपूर येथे भोले बाबा यांच्या सत्संगाच्या समारोपादरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा १०० पेक्षा अधिक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2 / 7या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हाथरस जिल्ह्यातील सिकंदराऊजवळील रतिभानपूर येथे भोले बाबा यांचा सत्संग समारंभ सुरू होता. त्याचदरम्यान, चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. 3 / 7मिळालेल्या माहितीनुसार रतिभानपूर भोले बाबा यांच्या प्रवचनादरम्यान तीव्र गरमीमुळे काही भक्त बेशुद्ध झाले होते. त्यानंतर सत्संगाच्या समारंभाच्या समारोपानंतर भाविक गरमीमुळे लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.4 / 7मंडपातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात लोक एकमेकांना धक्के देत जात होते. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भक्त विशेषकरून वृद्ध महिला चिरडल्या गेल्या आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. 5 / 7या घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींनी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तर घटनास्थळावरील चित्र अधिकच भयावह होतं. जागोजागी मृतदेह पडलेले होते. तर बचावलेले नातेवाईक आक्रोष करत होते. 6 / 7दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 7 / 7त्याबरोबरच, योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये एडीजी आग्रा आणि अलिगडच्या कमिश्नरांचा समावेश आहे. ही समिती दुर्घटनेमागच्या कारणांचा अभ्यास करून सरकारला अहवाल देतील. आणखी वाचा Subscribe to Notifications