दिल्ली विधानसभेचा फलोदी सट्टा बाजारालाही अंदाज लावता येईना; दोनवेळा बदलला, आता आहेत हे आकडे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:13 IST
1 / 8दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी पैसे वाटत असल्याचे, बुरखा घालून दुसरेच मतदान करत असल्याचे आरोप केले जात आहेत. मतदान झाल्या झाल्या एक्झिट पोल येणार आहेत. यातच फलौदी सट्टाबाजाराने आपला अंदाज लावत सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे. 2 / 8फलौदी सट्टाबाजारात अरविंद केजरीवाल यांच्या आपला २५ ते २७ जागांवर नुकसान होताना दिसत आहे. आपला ३५ ते ३७ जागा दाखविण्यात आल्या आहेत. असे असले तरी आप बहुमताचे सरकार बनविताना या आकड्यांद्वारे दिसत आहे. 3 / 8दुसरीकडे भाजपाही 33 ते ३५ जागा मिळविताना दिसत आहे. काँग्रेसच्या वाट्याला अक्षताच येण्याची शक्यता आहे. भाजपासाठी ही जोरदार मुसंडी ठरणार आहे. भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या निकालाच्या जिवावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे. 4 / 8केजरीवाल यांचे दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, त्यांनी सामान्य आयुष्य जगत असल्याचे दाखवून सत्ता मिळताच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात करोडोंच्या वस्तू वापरल्या आहेत. यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने उचलून धरला होता. यातच स्वाती मालिवाल या पक्षाच्याच राज्यसभा खासदाराला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात मारहाण होण्याचा मुद्दाही होता. 5 / 8यमुनेचे प्रदुषण, हवेचे प्रदुषण आदी अनेक मुद्दे केजरीवालांच्या विरोधात मतदान करण्यास पुरक ठरू लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत बुकींची भाकिते मतदानाच्या निकालात बदलले तर निवडणुकीनंतर पक्षांतर आणि आमदार फुटण्याची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. 6 / 8दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर, बुकींनी सत्ताधारी आम आदमी पक्षाला ३७ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.तर भाजपाला भाजपला २५ ते ३५ जागा मिळतील असे सांगितले होते. 7 / 8यानंतर बुकींचा अंदाज बदलला होता. सट्टेबाजी बाजारात आपच्या जागा ३८ वरून ४० पर्यंत वाढविण्यात आल्या होत्या. तर भाजपाच्या जागांचा आकडा २९ ते ३१ पर्यंत कमी करण्यात आला होता. आता पुन्हा हा आकडा बदलण्यात आला आहे. 8 / 8२५ जानेवारीला उघडलेल्या बाजारात भाजपाच्या सत्तास्थापनेचा भाव १.५० रुपये होता. तर आपचे पुन्हा सरकार येण्यावर बुकींनी ७० ते ८० पैसे किंमत ठेवली होता.