"Then I will remember Lakshadweep"; Ramdas Athawale's fantastic poem straight from the sea boat
"तब मुझे याद आयेगा लक्षद्वीप"; मंत्री आठवलेची थेट समुद्र बोटीतून भन्नाट कविता By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:12 AM1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी घेतल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव आणि फोटो सोशल मीडियातून शेअर केला होता.2 / 10मोदींनी आपल्या ट्विटरवरुन डेस्टीनेशन वेडिंगसाठी भारतातच सुंदर ठिकाणांना भेटी द्याव्यात आणि पर्यटन वाढीस चालना देण्याचंही सूचवलं होतं. 3 / 10मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील लक्षद्वीप हे निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण असल्याचं जगभर प्रसिद्धीस आलं. अनेकांनी मालदीवसोबत लक्षद्वीपची तुलना केली4 / 10सोशल मीडियात मालदीव आणि लक्षद्वीप वॉर सुरू झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, मालदीव सरकारमधील काहींना मिर्ची लागली होती. मात्र, अखेर मालदीव सरकारने भारताची माफीही मागितली होती. 5 / 10मोदींच्या दौऱ्यानंतर प्रसिद्धीस आलेल्या लक्षद्वीपाल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सहकुटुंब भेट दिली. आठवलेंनी येथील निसर्ग सुंदरतेवर कविताही केली. तसेच, फोटोही शेअर केले आहेत. 6 / 10दुनिया मे मै जहाँ भी जाऊंगा, वहाँ मै समंदर मे देखुंगा शिप, तो मुझे याद आयेगा लक्षद्वीप, अशी भन्नाट कविता रामदास आठवलेंनी लक्षद्वीपमधूनच केली.7 / 10लक्षद्वीपमध्ये समुद्रकिनारी रामदास आठवलेंच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केल होते, त्यावेळी ते बोलत होते.8 / 10येथील सामाजिक अधिकारीता शिबिरात दिव्यांग जणांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटपही मंत्री आठवले यांच्याहस्ते करण्यात करण्यात आले.9 / 10लक्षद्वीप की आज की शाम, करता हूँ मै दिव्यांगजनों के नाम, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, लक्षद्वीपच्या निसर्ग सौंदर्याचं कौतुकही केलं. 10 / 10दरम्यान, रामदास आठवलेंसह त्यांची पत्नी आणि मुलानेही लक्षद्वीप समुद्र काठावरुन आणि बोटीवरुन पर्यटनाचा आनंद घेतल्याचं दिसून येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications