शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: करून दाखवलं! ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; नियम पाळत देशासमोर आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 5:38 PM

1 / 12
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घसरण पाहायला मिळत असली, तरी वाढत्या मृत्युंमुळे चिंतेत भर पडत आहे.
2 / 12
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आता देशभरातील प्रशासन यासाठी तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्राकडून राज्य सरकारला विविध सूचना केल्या जात आहेत.
3 / 12
मात्र, देशात असे एक गाव आहे, जेथे गेल्या वर्षभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाने देशासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे. (no corona case in odisha ganjam village)
4 / 12
ओडिशा राज्यात गंजम जिल्ह्यातील एका गावाने कोरोना नियमांचे कसोशिने पालन करून देशासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केल्याचे म्हटले जात आहे.
5 / 12
भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून ते आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण या गावात आढळून आलेला नाही. गावकऱ्यांनी कोरोनाचे नियम उत्तम पद्धतीने पाळल्यामुळे या गावात कोरोनाचा शिरकाव अद्यापही झाला नसल्याचे सांगितले जात आहे.
6 / 12
ओडिशातील गंजम जिल्ह्यातील करंजारा गावातील नागरिक कोरोना रोखण्याचे सर्व नियम सुरुवातीपासूनच पाळत आले आहेत. त्यामुळे जगात कोरोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत एकही रुग्ण या गावात आढळलेला नाही.
7 / 12
या गावांत २६१ घरे असून, लोकसंख्या १ हजार २३४ इतकी आहे. एकाही गावकऱ्याने कोरोनाच्या लक्षणाविषयी आरोग्य विभागाकडे तक्रार केली नसल्याचे सांगितले जात आहे.
8 / 12
जानेवारी महिन्यात प्रशासनाने या गावातील ३२ नागरिकांची कोरोना चाचणी केली होती. त्यात कुणालाच करोना नसल्याचे निष्पन्न झाले होते.
9 / 12
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गावातील ग्रामस्थांमध्ये कोरोनाची जनजागृती आहे. गावातील प्रत्येक जण न चुकता मास्क घालतो. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळली जातात. गावकऱ्यांनी अत्यावश्यक वस्तूंचा घरी साठा केला आहे. अत्यावश्यक गरजेशिवाय ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत.
10 / 12
नव्या नियमावलीनुसार आशा आणि अंगणवाडी सेविकांना दारोदारी जाऊन करोना स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. करंजारा ग्रामस्थ जागरूक असून कटाक्षाने कोरोना नियमावली पाळत आहेत.
11 / 12
जगात कोरोनाचे संकट आल्यापासून आम्ही काळजी घेत आहोत. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. आमच्या गावातील काही जण मुंबईत कामाला आहेत.
12 / 12
त्यापैकी जे कुणी गावी परतले, त्यांनी १४ दिवस स्वत:ला संस्थात्मक क्वारंटाइन केले होते. तसेच कार्यक्रम, समारंभ टाळले आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOdishaओदिशा